आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन विजेत्यांना अ‍ॅक्टिव्हाची लॉटरी, दिव्य मराठीच्या कार्यालयात सोडत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पांडुरंग इंगोले अनुसया इंगोले यांना अ‍ॅक्टिवा दुचाकीची चावी देताना जैन इंटरनॅशनल स्कुलचे अभिजित छाजड, अ‍ॅटोमोटिव्ह चे व्यवस्थापक बिनय पंजीयार दिव्य मराठीचे अधिकारी,विक्रेते आदी. - Divya Marathi
पांडुरंग इंगोले अनुसया इंगोले यांना अ‍ॅक्टिवा दुचाकीची चावी देताना जैन इंटरनॅशनल स्कुलचे अभिजित छाजड, अ‍ॅटोमोटिव्ह चे व्यवस्थापक बिनय पंजीयार दिव्य मराठीचे अधिकारी,विक्रेते आदी.
औरंगाबाद - "दिव्य मराठी'तर्फे वार्षिक बुकिंगच्या वेळेला वितरित करण्यात आलेल्या कुपन्सची आज "दिव्य मराठी'च्या कार्यालयात सोडत काढण्यात आली. मनपा आयुक्त प्रकाश महाजन, पोलिस निरीक्षक प्रिया थोरात, गायकवाड क्लासेसचे पंढरीनाथ गायकवाड, माधव गाडे, जैन इंटरनॅशनल स्कूलचे अभिजित छाजेड, अॉटोमोटिव्हचे व्यवस्थापक बिनय पंजियार, डॉ. प्रशांत उदगिरे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.

तीन भाग्यवान अ‍ॅक्टिव्हा दुचाकीचे विजेते ठरले. यामध्ये पांडुरंग इंगोले, डॉ. एस.जी. पारगावकर पांडुरंग नरवडे यांचा समावेश आहे. पांडुरंग इंगोले पांडुरंग नरवडे यांना मान्यवरांच्या हस्ते गाडी हस्तांतरित करण्यात आली. इंगोले दांपत्याला दुचाकी हस्तांतरित करताना अश्रू अनावर झाले. लकी ड्रॉमध्ये एकूण आठ हजार ४४ वाचकांना बक्षिसे दिली जाणार आहेत. अ‍ॅक्टिव्हाव्यतिरिक्त टीव्ही, इंडक्शन, वॉशिंग मशीन, १० डिनर सेट, २० मिक्सर ग्राइंडर सेट प्रोत्साहनपर आठ हजार बक्षिसांचा समावेश असणार आहे. उर्वरित विजेत्यांची नावे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे. या वेळी जाहिरात सॅटेलाइट विभागाचे स्टेट हेड सुभाष बोंद्रे, एसएमडीचे स्टेट हेड प्रदीप झा, फायनान्स स्टेट हेड अजय पण्णीकर, एचआर स्टेट हेड निशिकांत तायडे, रिस्पाॅन्स स्टेट हेड अभिजित दासगुप्ता, एज्युकेशन जाहिरात स्टेट हेड बाळासाहेब खवले, युनिट हेड अमित डिक्कर, एसएमडी युनिट हेड भालचंद्र चौधरी, युनिट हेड एचआर अजित पती, जाहिरात युनिट हेड नौशाद शेख, जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, नावेद शेख, अनुष्का टिळक, अनिल सावंत यांची उपस्थिती होती. वितरकांसह वर्तमानपत्र विक्रेते संघटनेचे सचिव नीलेश फाटके, नंदकिशोर खंदारे, माणिक कदम, आसाराम कुलकर्णी, सर्जेराव शिंदे, भीमराव वायभट, काकासाहेब मानकापे, किशोर लहाने, नितीन बुराडे, अनिल बर्गे, शेख फईम, गणेश भोसले, शिवाजी ढेपले, सचिन पाटील, प्रकाश देशपांडे, संतोष घायवट आदिनाथ बांगर यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...