विद्यमान राज्य सरकार नावडते असल्याचा कौल तब्बल ८८ टक्के युवक व महिलांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यमान सरकारबद्दल १८ ते ३0 वयोगटातील युवक तसेच महिला वर्गाला नेमके काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने वाचकांचा कौल मागवला होता. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत वाचकांनी मोजक्याच चार प्रश्नांवर
आपली मते कळवली आहेत.
बहुसंख्य युवक व महिलांनी या सर्वेक्षणांतर्गत राज्य सरकारला भ्रष्टाचार आणि महागाईसाठी जबाबदार धरत सरकारच्या कामगिरीवर नापसंतीची मोहर उमटवली आहे. सद्य:स्थितीत बेरोजगारीचा प्रश्न या वर्गाला सर्वाधिक महत्त्वाचा वाटत असल्याचेही पुढे आले आहे. त्याचप्रमाणे वीज भारनियमनामुळेही जनता सरकारला वैतागली आहे. राज्यातील आवडता नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना प्रथम पसंती मिळाली आहे. आणि उद्धव ठाकरे यांना मतदार कौल देत आहेत. याबरोबरच निर्णय क्षमता, विकास, शेती, मराठा आरक्षण, बेरोजगारी, भारनियमन आणि दोन्ही पक्षांमधील सुंदोपसुंदी ही कारणे राज्य सरकारच्या नापसंतीला कारणीभूत ठरली आहेत. तसेच बेरोजगारी, भ्रष्टाचार, सिंचन, वीज, शिक्षण, शेती, रस्ते हे सर्वाधिक महत्त्वाचे प्रश्न असल्याचे मतदारांना वाटते. ‘कौल वाचकांचा’ या उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या हजारो संदेशांच्या सखोल विश्लेषणाअंती ‘दिव्य मराठी’ चमूने काढलेल्या निष्कर्षांची ग्राफिक्सच्या माध्यमातून केलेली ही मांडणी पुढील स्लाइडमध्ये...