आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : महाराष्ट्राच्या शुभांगी यांची लीगमध्ये पंचगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - शिस्तबद्ध, चाणाक्षपणा, पारदर्शकता, अचूकता अन् तत्पर निर्णयक्षमतेच्या याेग्य प्रकारच्या समन्वयातून सामन्यात खेळाडूंना दिला जाणारा न्याय हे उत्तम पंचाचे कार्य असते. याचाच प्रत्यय महाराष्ट्राच्या शुभांगी पुजारी-पाटील यांच्या पंचगिरीतून दिसून येताे. त्या यंदाच्या प्राे कबड्डी लीगमध्ये उल्लेखनीय पंचगिरी करत अाहेत. 
 
यंदा लीगमध्ये महाराष्ट्राच्या दाेन महिला पंच सहभागी झाल्या अाहेत. त्यांची या लीगमधील कामगिरी उल्लेखनीय ठरत अाहे. त्यांचा सहभाग हा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरताेय. 
 
पहिल्या  अांतरराष्ट्रीय पंच : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अांतरराष्ट्रीय पंच म्हणून शुभांगी यांची अाेळख अाहे. ए ग्रेड संपादन करणाऱ्या त्या देशात पहिल्या  महिला खेळाडू ठरल्या. त्यांनी २००६-०७ तेहरान येथील एशियन कबड्डी चॅम्पिनयशिपमध्ये सर्वाेत्कृष्ट पंचाची भूमिका बजावली.   
 
महिलांसाठी सर्वाेत्कृष्ट करिअर : खेळाडू म्हणून मैदान गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांना पंच म्हणून सर्वाेत्कृष्ट करिअरची संधी अाहे. यातून या खेळातील अापली अावड कायम ठेवण्याचीही संधी मिळते. यासाठी फिटनेस, जिद्द व अात्मविश्वासाची गरज अाहे, असेही त्यांनी सांगितले.
 
यंदा लीगमध्ये १४ महिला पंच 
पाचव्या सत्राच्या प्राे कबड्डी लीगमध्ये यंदा देशभरातील तब्बल १४ महिला पंच सहभागी झाल्या अाहेत. यात महाराष्ट्राच्या दाेन महिला पंचांचा समावेश अाहे.  मागील चार वर्षांत या संख्येत झपाट्याने वाढ हाेत अाहे. पहिल्या सत्रात ४, दुसऱ्या  सत्रात ७, तिसऱ्या अाणि चाैथ्या सत्रात १० महिला पंच हाेत्या.
 
१७ वर्षांपासून पंचगिरी 
खाे-खाेपटू असलेल्या शुभांगी यांनी कबड्डीत अल्पवाधीत अापला प्रभावशाली असा ठसा उमटवला. यासाठी त्यांना वडील साेमनाथ पुजारी यांचे माेलाचे मार्गदर्शन मिळाले. यातून त्यांना अल्पावधीत कबड्डीच्या मैदानापेक्षा वेगळी कामगिरी करण्याची संधी गवसली. त्यांनी कबड्डीच्या मैदानावर थेट पंच म्हणून करिअरला सुरुवात केली. यातून २००० पासून त्या पंचगिरी करत अाहेत.  
बातम्या आणखी आहेत...