आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील एक फेरफटकाही पाडू शकतो आजारी, सर्दी आणि दम्याचा धोका; हे आहे उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील एक फेरफटका आपल्याला आजारी पाडू शकतो. महिनाभरात दोन मोठ्या पावसामुळे रस्त्यावर आलेली माती आता वाळल्यामुळे हवेसोबत धूळ बनून उडत आहे. मनपानेही खड्डे बुुजवण्यासाठी ठिकठिकाणी मुरूम भरला आहे. यामुळे तुम्ही दुचाकीवर असा किंवा पायी, ही धूळ तुमच्या अंगाला खाज, सर्दी आणि चक्क दम्याला निमंत्रण देऊ शकते. गेल्या महिनाभरात हवेसोबत उडणाऱ्या धुळीचे प्रमाण तीनपटीने वाढले असून पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन रिसर्च अँड अवेरनेसने (सेरा) केलेल्या अभ्यासात हे स्पष्ट झाले. ज्येष्ठ नागरिक, बालके आणि रुग्णांना हा धोका अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 
 
गेल्या महिनाभरात शहरात दोन मोठे पाऊस झाले. या पावसासोबत रस्त्याच्या कड्यालगतची तसेच इतर भागातील माती पाण्यासोबत वाहून रस्त्यावर आली. मनपाने खड्डे भरण्यासाठी ठिकठिकाणी मुरूम टाकला आहे. पावसात हा मुरूम आणि मातीत ओलावा निर्माण झाल्यामुळे काही काळ जमिनीत बसली. परंतु दिवसांच्या कडक उन्हात ती कोरडी पडली आहे. वाहनांच्या हवेसोबत ती धूळ बनून हवेत उडत आहे. ती धोकादायक असल्याचे पर्यावरणाचे अभ्यासक डॉ. बलभीम चव्हाण यांनी सांगितले.

१८ ठिकाणी १२ तास निरीक्षण : सेराया संस्थेने शहरातील १८ ठिकाणांवर सेटलेबल पर्टिक्युलेट मॅटर (एसपीएम) मोजले. या ठिकाणी सकाळी ते संध्याकाळी या वेळेत एक चायना डीश ठेवण्यात आली. डीशचे सुरुवातीचे आणि दोन तासांनंतरचे वजन माेजण्यात आले. दुसऱ्या वजनातून पहिले वजन वजा करून आलेले वजन म्हणजे त्यावर जमा झालेली धूळ होती. पहिल्या आणि दुसऱ्या मोठ्या पावसानंतर केलेल्या या प्रयोगाची सरासरी काढून सूत्राद्वारे धुळीचे प्रमाण मोजण्यात आले. 
 
रुग्ण वाढले 
- यंदा थंडी,तापाचे नव्हे, तर अॅलर्जीचे रुग्ण वाढले आहेत. धुळीमुळे सर्दी, नाक वाहणे, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.
-डॉ. किशोर पाठक, जनरल फिजिशियन 
 
धोकादायक पातळी 
- आम्ही महिनाभरात दोन वेळेस धूलिकणांची तपासणी केली. यात हे प्रमाण तीनपट वाढल्याचे दिसले. पालिकेने रस्त्यांच्या साफसफाईवर लक्ष देणे आवश्यक आहे. धूळ अनेक रोगांना आमंत्रण देणारी आहे.
- माधवी शिरोडकर, सेरा 
 
मुरूम टाकणे चुकीचे 
- रस्त्यातील खड्डेबुजवण्यासाठी मुरूम टाकणे चुकीचे आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत माती रस्त्यावर आली आहे. ती हवेसोबत उडून प्रदूषणात हातभार लावते.
-प्रा. प्रियानंद आगळे, इको नीड्स फाउंडेशन 
 
उपाय काय :धुळीच्या ठिकाणी वाहनांची गती कमी ठेवणे, नियमित अंतराने रस्ते स्वच्छ करणे, धुळीवर पाणी फवारणे.
 
दम्याचा धोका : धुळीसोबतमातीतील जंतू नाकातोंडात जाऊन डोळ्यांत जळजळ, घसा दुखणे, नाक वाहणे, खोकला, हृदयविकार, छातीदुखी असा त्रास जाणवतो. सततच्या धुळीने दमा संभवतो. 
 
धूलिकण तिप्पट वाढले 
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे ५० तर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांप्रमाणे १०० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरपेक्षा अधिक धूलिकण धोकादायक आहेत. या चाचण्यात १८ पैकी ठिकाणी धूलिकणांचे प्रमाण क्षमतेपेक्षा तिप्पट आढळले आहे. 
 
रेल्वेस्टेशन - २९८.९८ 
विद्यापीठ गेट - २७२.३ 
सिटी चौक - ३०१.०७ 
मिल कॉर्नर - ३१२.७ 
हर्सूल टी-पॉइंट - १९८.०९ 
दर्गा चौक - ३३४.७२ 
दूध डेअरी - ३४४.२७ 
संग्रामनगर पूल - ३११.२६ 
क्रांती चौक - ३२५.६६ 
सेव्हन हिल्स - २९९.७६ 
गुलमंडी - २८८ 
गजानन मंदिर - ३२६.८७ 
बस स्टँड - ३२३.०२
एसबी कॉलेज-  २९९.९६ 
चिकलठाणा - २९८ 
विमानतळ - २११.०९ 
टीव्ही सेंटर  - ३१२.४ 
रोशन गेट - ३०६.०९ 
बातम्या आणखी आहेत...