आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Special Story About Farmer Suicide Case

शेतकरी जातो जिवानिशी, वारसांच्या हाती ३० हजार, ७० हजार ६ वर्षे ठेव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कर्जबाजारीपणा, नापिकीच्या कारणाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखाची मदत देण्याचा डिंडोरा सरकार पिटत असले तरी प्रत्यक्षात मात्र विदारक स्थिती आहे. मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या एक लाखापैकी ३० हजारच वारसांच्या हाती रोखीने दिले जातात. उरलेले ७० हजार रुपये बँक खात्यात ठेवीच्या स्वरूपात सहा वर्षांसाठी जमा केले जातात. कर्ता गेल्यावर उघड्यावर आलेल्या कुटुंबाला मासिक प्राप्ती व्हावी हा हेतू सरकारचा ठेवीमागे आहे. परंतु प्रत्यक्षात गरजेच्या वेळीच तुटपुंजी रक्कम कुटुंबाच्या हाती येते आणि उरलेली ६ वर्षे ठेवी स्वरूपात ठेवली जाते. पैठण तालुक्यात दोन विधवांशी चर्चा केली असता सहा वर्षांनंतर एक लाखांहून जास्त रक्कम हाती पडेल असे सांगण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. शेतकऱ्याचे खाते असेल त्या स्थानिक बँकेत ही ठेवीची रक्कम गुंतवली जाते. संबंधित बँकेच्या व्याजदरानुसार
सहा वर्षांत या ७० हजारांचे एक लाखांहून अधिक पैसे होतात. बँक, अधिकृत सावकाराचे कर्ज असेल तरच एक वारसांना एक लाखाची मदत दिली जाते. मराठवाड्यात जानेवारी ते मार्च २०१६ या तीन महिन्यांत २७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यातील ११४ पात्र ठरले. यावरून मदतीसाठी किती काटेकोरपणे शहानिशा केली जाते याची कल्पना येते. शेतकऱ्याच्या पत्नीच्या नावे मदतीच्या रकमेचे धनादेश दिले जातात.
मदतीसाठी पात्रतेचा निकष : आत्महत्या नापिकीमुळे केलेली असावी. राष्ट्रीयीकृत किंवा खासगी बँकेचे कर्ज शेतकऱ्याच्या नावावर हवे. अधिकृत सावकाराकडून कर्ज घेतल्याची कागदपत्रे हवीत.
सर्वरक्कम रोखीने द्या : हातीयेणारी रक्कम उत्तरकार्य, देणी देण्यातच जाते. यामुळे सर्व रकमेची रोखीने मदत करण्याची मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे. प्रसंगी आंदोलनही करू, असा इशारा शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष कैलास तवार यांनी दिला.