आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी’च्या उषा बोर्डे यांना लाडली माध्यम पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -  लिंगभेदाविरोधात केल्या जाणाऱ्या संवेदनशील लेखनाला देण्यात येणारा ‘लाडली माध्यम पुरस्कार’ दैनिक दिव्य मराठीच्या उपसंपादक उषा बोर्डे यांना नुकताच अहमदाबाद येथे प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध नृत्यांगना व सामाजिक कार्यकर्त्या मल्लिका साराभाई यांच्या हस्ते अहमदाबाद येथील गुजराती साहित्य परिषदेमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे  या पुरस्काराचे स्वरूप आहे.  
 
बोर्डे यांनी २०१३ पासून सुमारे ३ वर्षे ‘सॅनिटरी नॅपकीनच्या व्हेंडिंग मशिन्स’ या विषयावर लेखन करून शासन दरबारी याचा पाठपुरावा केला होता. बातम्या, पाठपुरावा तसेच विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन बोर्डे यांनी ग्रामीण महिलांमध्ये जनजागृती मोहीमही राबवली होती. त्याचा परिपाक म्हणून गेल्या वर्षी आैरंगाबाद जिल्ह्यातील आरोग्य विभागात सुमारे ९८ ठिकाणी या व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या. शिवाय शहरातील महाविद्यालयांतही मशिन्स बसवण्यात आल्या. 

महिला बचत गटांना या मशिन्सचा ठेका मिळावा व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत अशी सुविधा सुरू व्हावी, यासाठी सध्या पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत ‘बेस्ट आर्टिकल सिरीज’ या विभागात त्यांना हा पुरस्कार पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेच्या वतीने प्रदान करण्यात आला. पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराला “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’चे पाठबळ लाभले आहे.
बातम्या आणखी आहेत...