आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपेक्षा जनतेच्या : कामगारांना हवेत राखीव मतदारसंघ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राजकीय पक्षांनी त्यांचे जाहीरनामे बनवण्यापूर्वी जनतेच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि गरजा त्यांना कळाव्यात म्हणून जनतेशीच क्षेत्रनिहाय साधलेला थेट संवाद.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येणाऱ्या नव्या राज्यकर्त्यांकडून कामगारांच्या काय अपेक्षा आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न दै‌. ‘दिव्य मराठी’च्या ‘टॉक शो’ उपक्रमात शनिवारी करण्यात आला. त्यात असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायद्याचे कवच, कामगार कायद्यांची कडक अंमलबजावणी, महागाई दरानुसार वेतन, कामगारांसाठी राखीव मतदारसंघ आणि निवृत्तीनंतर किमान दोन जणांचा उदरनिर्वाह होईल एवढी पेन्शन देणारे धोरण आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
- महागाईच्या तुलनेत कायद्यातील किमान वेतन मर्यादेत बदल हवा.
- कामगारांच्या प्रश्नासाठी कामगारबहुल विधानसभा मतदारसंघ राखीव ठेवा.
- कर्मचारी कल्याणासाठी बजेटमधील ०.८ टक्के तरतूद ३ टक्के करावी.
- कामगारांच्या पाल्यांना उद्योगांत रिक्त जागांवर प्राधान्य, भागीदारी मिळावी
- समान काम, समान दाम कायदा हवा.
- ११ महिन्यांच्या सेवेनंतर कायम करावे.
- उपचारांची जबाबदारी सरकारने घ्यावी.
- कामगारांना कर आकारू नयेत.
- असंघटित कामगारांना आरोग्य विमा, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी द्या.
- ईएसआयसीच्या लाभासाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यात यावी.