आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मीनगरची टाकीच सोडवेल पाण्याचा प्रश्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लक्ष्मीनगरची पाण्याची टाकी कार्यान्वित झाल्यावरच गारखेड्यातील पाण्याचा प्रश्न सुटणार असून त्यासाठी येत्या आठवड्यात आयुक्तांनी पाहणी केल्यानंतर महिनाभरात त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यायला भाग पाडू, अशी ग्वाही गारखेडा वॉर्डाचे नगरसेवक व मनपातील सभागृहनेते सुशील खेडकर यांनी दिली. वॉर्डातील रस्त्यांची जी कामे शिल्लक आहेत ती येत्या महिन्याभरात मार्गी लागतील, असा शब्द त्यांनी दिला.

‘दिव्य मराठी’तर्फे विकास मंच अभियानाचा उपक्रम रविवारी गारखेड्यातील साहस सोसायटीतील गणपती मंदिराच्या प्रांगणात झाला. या भागात पाणी येण्याची वेळ पहाटे पावणेचारची आहे. त्याबाबत नागरिकांनी ओरड केली व किमान सोयीची वेळ ठेवा, अशी मागणी केली. किती दिवस टँकर विकत घ्यायचे, असा सवाल महिलांनी केला. वॉर्ड अधिकारी व्ही. डी. राठोड, उपअभियंता पी. आर. बनसोडे, अभियंता मिस्कीन, ख्वाजाभाई उपस्थित होते.