आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास मंच : नाल्याची दुर्गंधी तत्काळ थांबवा; नगरसेवक राठोड यांचा महापौर, आयुक्तांना इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको एन-3, एन-4 वॉर्डातील नागरिकांना जगणे मुश्कील करणार्‍या नाल्याची दुर्गंधी थांबवा, अन्यथा रामगिरी हॉटेलजवळ या नाल्याचे तोंड मुरूम टाकून बंद केले जाईल, असा इशारा नगरसेवक प्रमोद राठोड यांनी महापौर, आयुक्तांना दिला आहे.
प्रसारमाध्यमांनी केवळ बातम्यांपुरते र्मयादित न राहता नागरिक, लोकप्रतिनिधींच्या मदतीने शहराच्या विकासाचा मार्ग निर्माण केला पाहिजे, अशी भास्कर वृत्तपत्र समूहाच्या ‘दिव्य मराठी’ची ठाम भूमिका आहे. त्याच अंतर्गत विकास मंच अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यात नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींचे नगरसेवकांनी काय केले, याचा पाठपुरावाही ‘दिव्य मराठी’ने सुरू केला. रविवारी सिडको एन-3 येथील केटली गार्डनमध्ये झालेल्या अभियानात नागरिकांनी एन-3, एन-4 मधून वाहणार्‍या नाल्यात ड्रेनेजचे पाणी सोडले असल्याने दुर्गंधी प्रचंड वाढली आहे. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. त्याची दखल घेऊन राठोड यांनी सोमवारी (9 डिसेंबर) महापौर कला ओझा, आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना खरमरीत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ही जीवघेणी समस्या सोडवण्यासाठी आपण तत्काळ अधिकार्‍यांना आदेश द्यावेत. अन्यथा जेथून (रामगिरी हॉटेलच्या मागील बाजूस) नाल्यात ड्रेनेज लाइन्स सोडल्या आहेत तो भाग मुरूम टाकून बंद केला जाईल. या प्रश्नावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वी उल्कानगरी, विश्वभारती कॉलनी वॉर्डात झालेल्या अभियानात नागरिकांनी कचरा उचलला जात नाही, अशी तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन उपमहापौर संजय जोशी, नगरसेविका साधना सुरडकर यांनी चार सफाई कर्मचारी वाढवले आहेत.