आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटीतटीच्या लढतीत "दिव्य मराठी'चा संघ ठरला उपविजेता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंत्तीनिमित्त आयोजित इंटर प्रेस क्रिकेट स्पर्धेत "दिव्य मराठी' संघाने कर्णधार सुमेर हिवरेकरच्या नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले. एडीसीए मैदानावर झालेल्या लढतीत अंतिम फेरीत लोकमतने ३७ धावांनी विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना लोकमतच्या संघाने १० षटकांत १ बाद ९९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात "दिव्य मराठी'च्या संघाने निर्धारित षटकांत ६ बाद ६२ धावा केल्या. यात सलामीवीर भारत दुधाटेने १८ चेंडूंचा सामना करताना १८ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने २ चौकार लगावले. ऋषिकेश जीवनवालने १३ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २० धावा काढल्या. योगेश जैस्वालने २, विनोद आव्हाडने ६, सूरज जोशीने १, हरेंद्र केंदाळेने नाबाद ३ धावा जोडल्या. गोलंदाजीत अविनाश करडने २ षटकांत ४ धावा देत २ गडी बाद केले. सुनील गिऱ्हे, दुर्गेश जोशी, विनोद काकडे, वैजीनाथ सोनवणे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी लोकमत संघाकडून शुभम मोहितने १४ चेंडूंत ३१ धावा काढल्या. सचिन लहानेने २८, अविनाश करडेने १० आणि दुर्गेश जोशीने नाबाद २० धावांचे योगदान दिले. तुषार गांगुर्डेने २ षटकांत १७ धावा देत १ गडी बाद केला. "दिव्य मराठी'चे संघ व्यवस्थापक म्हणून नीलेश जोशी यांनी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंना चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.