आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशी-विदेशी वाहने पाहण्यासाठी झुंबड, 'ऑटो एक्स्पो २०१६'चे थाटात उद‌घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकाच छताखाली देशी-विदेशी कंपन्यांची वाहने पाहण्याची खरेदी करण्याची सुवर्णसंधी 'दिव्य मराठी'ने 'ऑटो एक्स्पो २०१६'च्या माध्यमातून औरंगाबादकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या वाहन प्रदर्शनाचे गुरुवारी जगविख्यात आॅटोमोबाइल तज्ज्ञ टूटू धवन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी वाहनप्रेमींकडून या प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. ऑटो एक्स्पो ही काळाची गरज असून धावपळीच्या युगात वस्तू खरेदी करण्यासाठी एकाच ठिकाणी, एकाच वेळी सर्व माहिती हवी असते. त्यामुळे 'दिव्य मराठीचा' ऑटाे एक्स्पो लोकांची गरज भागवणारा असून केवळ एकट्या-दुकट्याचे नाही तर हा एक्स्पो कौटुंबिक भेटीचे ठिकाण झाले पाहिजे, अशी भावना धवन यांनी व्यक्त केली.

तापडिया कासलीवाल मैदान, बाबा पेट्रोल पंप येथे हे प्रदर्शन भरवण्यात आले असून देश आणि विदेशातील विविध कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे भव्य स्टॉल्स येथे लावण्यात आले आहेत. चेंबर ऑफ ऑथराइज्ड ऑटोमोबाइल डीलर्स, सोहम ह्युंदाई तसेच व्होक्सवॅगन औरंगाबाद, गिरिजा मोटर्स, महिंद्रा फर्स्ट चॉइसच्या सहकार्याने या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनप्रसंगी "दिव्य मराठी'चे सीओओ निशित जैन, स्टेट एचआर हेड निशिकांत तायडे, युनिट हेड अमित डिक्कर, ऑटोमोबाइल असोसिएशनचे अध्यक्ष मनीष धूत आणि महिंद्रा फर्स्ट चॉइसचे स्टेट हेड सार्थक अग्रवाल आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जाहिरात विभागाचे स्टेट हेड (सॅटेलाइट) सुभाष बोंद्रे, जाहिरात विभागप्रमुख नौशाद शेख, जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, एचआर डेप्युटी मॅनेजर अजित पती, स्टेट हेड एज्युकेशन जाहिरात बाळासाहेब खवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

'ऑटो एक्स्पो २०१६' रविवार २० मार्चपर्यंत सुरू राहणार असून सकाळी ११ ते रात्री या वेळेत शहरवासीयांना विविध वाहने पाहण्याची, माहिती घेण्याची संधी आहे. मर्सिडिझ, हर्ले डेव्हिडसन, पुणे येथील दिलीप छाब्रिया यांनी तयार केलेली डीसी अवंती स्पोर्ट्स कार प्रदर्शनाचे विशेष आकर्षण आहे. उद्घाटनानंतर महाविद्यालयीन तरुण-तरुणींनी आवडीची वाहने पाहण्यासाठी स्टॉल्सवर गर्दी केली. सायंकाळी वाहनप्रेमींनी कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

मान्यवरांकडून कौतुक
धवनम्हणाले की, हा एक्स्पो वाहन विक्रेत्यांपेक्षा ग्राहकांना जास्त फायद्याचा ठरणारा आहे. दिवसेंदिवस चारचाकी वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एक्स्पो ही अशी एक जागा असते जेथे फार पळापळ करता तुम्ही वाहनांची माहिती सहजपणे गोळा करण्याची हौस भागवू शकता. त्यानंतर खरेदीचा निर्णय घेऊ शकता. धूत म्हणाले की, दुसऱ्यांदा आयोजित हे प्रदर्शन अधिक सुंदर आकर्षक आहे. या वेळेस वाहनप्रेमींना वैविध्यपूर्ण चारचाकी, दुचाकी गाड्या पाहायला मिळणार असून शहरवासीयांनी याचा लाभ घ्यावा. सार्थक अग्रवाल यांनीही ऑटो एक्स्पो ही काळाची गरज असून 'दिव्य मराठी'चा एक्स्पो वाहनप्रेमींना काहीतरी देऊन जाणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रदर्शनात सहभागी प्रतिष्ठाने
शिरीननिस्सान (निस्सान, डॅटसन), रत्नप्रभा मोटर्स (महिंद्रा), मोक्ष मोटार बाइक कंपनी (हर्ले डेव्हिडसन), हायकॉन सुझुकी (सुझुकी), पगारिया बजाज (बजाज), स्टेट बँक ऑफ इंडिया, रामतारा मोबिलिटी (व्हेस्पा), महेश टीव्हीएस (टीव्हीएस), रत्नप्रभा मोटर्स होंडा (होंडा मोटर्स), सेठी मोटर्स (महिंद्रा दुचाकी), सोहम ऑटो (यामाहा), शेल लुब्रिकंट्स (शेल ऑइल), ब्लोसम कार डिटेलिंग (ब्लोसम), राज ऑटो हीरो मोटार कॉर्पोरेशन (हीरो), व्होक्सवॅगन औरंगाबाद (व्होक्सवॅगन), रत्नप्रभा फोर्ड (फोर्ड), सोहम ह्युंदाई (ह्युंदाई), गिरिजा मोटर्स (महिंद्रा फर्स्ट चॉइस), धूत मोटर्स (ह्युंदाई), डेक्कन होंडा (होंडा), शेवरोले, टाटा, डीसी मोटर्स (अवंती), मर्सिडीझ बेंझ बी. यू. भंडारी (मर्सिडीझ), पगारिया नेक्सा (नेक्सा).
मर्सिडीझ, हर्ले डेव्हिडसन, डीसी अवंती भोवती गर्दी
आॅटो एक्स्पोच्या उद्घाटनानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून वाहन रॅली काढण्यात आली. तापडिया कासलीवाल मैदान येथून निघालेल्या या रॅलीत मर्सिडीझ कार, हर्ले डेव्हिडसन दुचाकी आदी वाहनेही रॅलीत सहभागी झाली होती. विवेकानंद महाविद्यालय, निराला बाजार, गुलमंडी, सिटी चौक, हडको कॉर्नर, टीव्ही सेंटर चौक, कॅनॉट प्लेस, सिडको बसस्थानक, गजानन महाराज मंदिर, आकाशवाणी, क्रांती चौक असा रॅलीचा मार्ग होता.
'दिव्य मराठी'च्या वतीने तापडिया-कासलीवाल मैदान येथे भरवण्यात आलेल्या आॅटो एक्सोच्या निमित्ताने शहरात मर्सिडीझ कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीला झेंडी दाखवून उद्घाटन करताना आॅटो एक्स्पर्ट टुटू धवन. सोबत सार्थक अग्रवाल, मनीष धूत, दिव्य मराठीचे सीओओ निशित जैन, निशिकांत तायडे, अमित डिक्कर, सुभाष बोंद्रे, नौशाद शेख, विकास लोळगे, अजित पती, बाळासाहेब खवले आदी. छाया : अरुण तळेकर
बातम्या आणखी आहेत...