आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi\'s Compaign Annadata Compaign Starts

\'दिव्य मराठी\'च्या वतीने अन्नदान मोहिमेस प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागात भुकेल्या, गोरगरिबांना सुखाचे दोन घास मिळावेत, यासाठी भास्कर समूहाच्या ‘दिव्य मराठी’ने अन्नदान उपक्रम हाती घेतला आहे. संपूर्ण भारतातून जमा केलेले अन्न वाटप केले जाणार आहे. आपण आज समृद्ध आहोत, पण खूप व्यग्र आहोत. आपल्या समस्या आपल्यासाठी डोंगराएवढ्या आहेत; पण भुकेल्या पोटापुढे कोणतीही समस्या जगात मोठी नाही. तरी आम्हा सर्वांनी आपल्याकडील अल्पसे का होईना अन्नदान करायला हवे. आपण आपल्या मर्जीनुसार शक्य तेवढे गहू, तांदूळ किंवा डाळी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत आणून देऊ शकता.
अधिक माहितीसाठी ‘दिव्य मराठी’चे सूरज जोशी (८३९०९०७८२०) यांच्याशी संपर्क साधावा. पितृपक्षात अन्नदानाचे महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या नावे अन्नदान करून त्यांना परम शांती देण्याची हीच योग्य वेळ आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, रोटरी, जायंट्स, लायन्स क्लबचे सदस्य आदींनी या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, अशीही अपेक्षा आहे.