आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी'चा संगणक प्रशिक्षण उपक्रम वर्षभर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ज्येष्ठ नागरिक, गृहिणींसाठी "दिव्य मराठी'तर्फे प्रत्येक वर्षाच्या प्रारंभी मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रम राबवला जातो. तो आता पूर्ण वर्षभर राबवला जाणार आहे. त्याची सुरुवात ३ ऑगस्टपासून होणार आहे. संगणकाचे ज्ञान असणे आजच्या काळाची गरज आहे. त्या माध्यमातून आपण तंत्रज्ञान आणि जगाशी जोडले जातो. ज्ञानाच्या कक्षाही रुंदावतात. मात्र, वयाची अडचण, कामाचा व्याप यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांना संगणकाचे व्यावसायिक प्रशिक्षण देणा-या संस्थांमध्ये जाणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन "दिव्य मराठी'ने त्यांच्यासाठी मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात नोंदणीसाठीचा अर्ज २१ जुलैच्या अंकात प्रकाशित करण्यात आला आहे. नोंदणीसाठी पुढील क्रमांकांवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा. औरंगाबाद : ८३९०९०७८२०, नाशिक : ७५०७७७३९२५, जळगाव : ८८०६९३६७७७, सोलापूर : ९७६५५६२८७२, अकोला : ०७२४-२४५०७१०.
बातम्या आणखी आहेत...