आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिर्यारोहण मोहिमेबद्दल सतीश वैराळकरांचा गौरव,कैलास मानसरोवर यात्रेत सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सशस्त्र सीमा दलच्या राणीखेत क्षेत्रातर्फे आदी कैलास व ओम पर्वत गिर्यारोहण मोहीम आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेतील ४० जणांच्या तुकडीत ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी चीफ रिपोर्टर सतीश वैराळकर सहभागी झाले होते. सैन्य दलाच्या तुकडीसोबत त्यांनी ३११ किलोमीटरचे अंतर पायी पार केेले. या अनोख्या, धाडसी कामगिरीबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सशस्त्र सीमा दलाचे राणीखेत क्षेत्राचे महानिरीक्षक श्यामसिंग यांनी वैराळकरांना प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी कमांडंट राजेश ठाकूर, द्वितीय कमांडंट संजय शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सीमा दलाच्या वतीने भारत-चीन सीमेवरील आदी कैलास व ओम पर्वतावर चढाई मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडमध्ये पिठोरागड जिल्ह्यातील हिमालय पर्वताच्या अतिदुर्गम भागात प्रथमच ही मोहीम होती. उंच शिखरावर प्राणवायूची कमतरता असताना तुकडीने आदी कैलास, ओम पर्वताची शिखरे पादाक्रांत केली. यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाच्या "दिव्य मराठी' औरंगाबाद आवृत्तीचे डेप्युटी चीफ रिपोर्टर सतीश वैराळकर यांचेही लष्करी अधिकाऱ्यांनी कौतुक केले. मोहिमेत सहभागी झालेले ते एकमेव माध्यम प्रतिनिधी होते,असेही श्यामसिंग यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...