आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marthi Initiative: Junior Editors Keep Various Social Subject

दिव्य मराठीचा उपक्रम : ज्युनियर एडिटर्सनी मांडले सामाजिक विषय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील वाढता भ्रष्टाचार, दहशतवाद, बालमजुरी अशा देशासमोर आ वासून उभ्या असणार्‍या समस्या शहरातील विद्यार्थ्यांनी ‘दिव्य मराठी’च्या ज्युनियर एडिटर उपक्रमाद्वारे मांडल्या आहेत. कसाबच्या फाशीसारख्या विषयावरही अगदी प्रगल्भपणे या विद्यार्थ्यांनी मते मांडली. या उपक्रमात सहभागी झालेल्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकांचे परीक्षण रविवारपासून (31 मे) सुरू झाले.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना निर्माण व्हावी व वृत्तपत्र निर्मितीबद्दल त्यांना ज्ञान मिळावे या उद्देशाने या स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. अ, ब, क, ड अशा चार गटांत ही स्पर्धा घेण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. भास्कराचार्य इंग्लिश स्कूलचे (चाटे स्कूल) शिक्षक धनंजय पांडे, भास्कर गोल्हार, संजय टकले यांनी या अंकाच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण केले. यातून निवडले जाणारे अंक राज्यपातळीसाठी पाठवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या अंकांचे प्रदर्शनही लवकरच भरवण्यात येणार आहे.

मांडणी, व्याकरण महत्त्वाचे
ज्युनियर एडिटर या स्पध्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढावी आणि समाजात घडणार्‍या घटनांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी विद्यार्थ्यांना मिळावी हा प्रयत्न करण्यात आला. बातम्यांची मांडणी, व्याकरण यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. माझे शहर, माझा देश, माझे आजी-आजोबा, 2050 मधील भारत, येणार्‍या पिढीसमोरील आव्हाने या विषयावर मुलांचे लिखाण या अंकात अपेक्षित होते.