आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Premier Cricket League,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गजांचा संघ ‘गजानन ऑइल युवा खेळाडूंमुळे परिपूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिव्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी नितीन जाधव यांच्या गजानन ऑइल इंडियन्सचा संघ अनुभवी आणि युवा खेळाडूंनी परिपूर्ण असल्याने विजेतेपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. संघात वसीम खान, विकास नगरकर, प्रदीप चौधरी, पंकज फलके, भास्कर जिवरग, सय्यद सरफराज यांच्यावर संघाची मदार असेल. युवा खेळाडू संकेत शर्मा, हर्ष श्रॉफ, विनोद कर्डिवाल, केदार काळे यांच्यामुळे संघाला मजबुती मिळाली असून डीपीएलमध्ये चमकदार कामगिरी करून ठसा उमटवण्यास गजानन ऑइल संघ कसून तयारी करत आहे. संघाचा पहिला सामना स्पर्धेचा उद्घाटनीय सामना विनोद पाटील टायगर्सवरुद्ध एडीसीएच्या मैदानावर 22 जून रोजी दुपारी 12.30 वाजता होईल.

वसीम, विकास, प्रदीप, पंकज, भास्करवर संघाची जबाबदारी

वसीम खानवर सर्वाधिक बोली लावून गजानन ऑइलने त्याला आपल्या संघात घेतले आहे. तो संघाचा विश्वासपात्र आणि महत्त्वाचा फलंदाज असल्याने जास्तीत जास्त धावा करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. तो मॅच विजेता खेळाडू असून त्याच्यात कुशल नेतृत्व गुण आहेत. विकास नगरकर व पंकज फलकेमुळे संघाची ताकद वाढली असून टफ विकेटवर खेळण्याचा भरपूर अनुभव या दोन्ही खेळाडूंना आहे. तडाखेबंद फलंदाजी हे त्यांचे वैशिष्ट्य. संदीप लहाने शैलीदार फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज आहे. त्याचे फटके पाहण्यासारखे असतात. भास्कर जिवरग अष्टपैलू खेळाडू असून दबावात उत्कृष्ट खेळतो. संजय पाटील अष्टपैलू खेळाडू आहे.
बबलू, सरफराज, प्रवीण, अमोलवर गोलंदाजीचा भार

संघाच्या गोलंदाजीचा भार बबलू पठाण, सय्यद सरफराज, प्रवीण कुलकर्णी आणि अमोल पवार यांच्यावर असेल. बबलूला ‘औरंगाबादचा मलिंगा’ या नावाने ओळखले जाते. स्लॉग ओव्हरमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करतो. अष्टपैलू सरफराजची चकवा गोलंदाजी विरोधी फलंदाजांना अडचणीत आणते आणि त्याची फलंदाजी संघाला फायद्याची ठरेल. प्रवीण यॉर्कर स्पेशालिस्ट आणि अमोल इनस्विंग गोलंदाजी करण्यात माहीर आहे. या संघाला प्रशिक्षक विवेक येवले यांचे मार्गदर्शन लाभत आहे. वाजेद खान संघ व्यवस्थापक आहे.

संघात झुंज देण्याची क्षमता

स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ आमचा गजानन आॅइल इंडियन्स आहे. अनुभवी खेळाडू आणि युवा खेळाडूंचे योग्य मिश्रण संघात आहे. वसीम, विकास, सरफराज, पंकज, भास्कर, संदीपसारखे दिग्गज खेळाडू आम्हाला मिळाले आहेत. हे सर्व मॅच विजेता खेळाडू असल्याने यंदा आम्हाला कोणी रोखू शकत नाही.
नितीन जाधव, गजानन ऑइल इंडियन्स