आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Divya Premier League', Latest News In Divya Marathi

गजानन ऑइल इंडियन्सचा ‘ग्रँड’ विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तनवाणी (नि:शुल्क शुद्ध पेयजय उपक्रम) प्रस्तुत ‘दिव्य प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या लढतीत नितीन जाधव यांच्या गजानन ऑइल इंडियन्स संघाने गोविंद अग्रवाल यांच्या ग्रँड कल्याण संघावर 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासह संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. या सामन्याच्या निकालावर गजाननसह विनोद पाटील टायगर्स, ग्रँड कल्याणचेदेखील भविष्य अवलंबून होते. मात्र, अखेर गजानन ऑइलने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना गँरड कल्याणने 20 षटकांत 8 बाद 109 धावांचे माफक आव्हान उभारले. प्रत्युत्तरात गजानन ऑ इलला 11.1 षटकांत हे आव्हान पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. गजाननने 10.4 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.
एडीसीएवर झालेल्या साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत नाणेफेक जिंकून गजाननने ग्रँड कल्याणला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गजाननचा हा निर्णय योग्य ठरला. त्याच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ग्रँड कल्याणला 109 धावांवर रोखले. ग्रँड कल्याणची सर्व मदार प्रदीप जगदाळेवर होती. या महत्त्वाच्या सामन्यात प्रदीपसह दुसरा सलामीवीर सय्यद इनायत भोपळाही फोडू शकले नाहीत. त्यामुळे संघाने कशीबशी शंभरी गाठली. सय्यद सरफराजने या दोन्ही खेळाडूंना बाद करून संघाला शानदार सुरुवात करून दिली. तिस-या क्रमांकावर आलेल्या शेख शारेकने एकाकी लढत दिली. त्याने 25 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार लगावत 37 धावा काढल्या. त्याला बबलू पठाणने झेलबाद केले. मध्याल्या फळीतील योगेश चौधरी (4), रहेमान दत्ते (4), ऋषिकेश तायडे (12) हे मोठी खेळी करू शकले नाहीत. तळातील फलंदाज मुनेश्वर गावंडेने धावा काढण्यासाठी संघर्ष केला. त्याने 22 चेंडूंत 2 चौकारांसह 18 धावा जोडल्या. त्याचप्रमाणे मुनेश्वर आणि संदीप सहानी या जोडीने 37 धावांची भागीदारी रचली. सहानीने 16 धावा काढल्या. गजाननकडून सय्यद सरफराज आणि हर्ष श्रॉफने प्रत्येकी 3 गडी बाद केले. बबलू पठाण आणि भास्कर जिवरगने प्रत्येकी एकाला टिपले.

विकास नगरकरची तुफानी फलंदाजी
धावांचा पाठलाग करताना गजानन ऑ इलची सुरुवात चांगली झाली. ग्रँड कल्याणच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे गजानन ऑइलचा विजय सोपा झाला. सलामीवीर संदीप लहाने आणि वसीम खान यांनी 2.4 षटकांत 29 धावांची सलामी दिली. लहानेने 11 चेंडूचा सामना करताना 3 चौकार आणि 1 षटकार लगावत 23 धावा काढल्या. त्याला इनायत सय्यदने त्रिफळाचीत करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुसरा सलामीवीर वसीम खान अवघ्या 5 धावा काढून शेख अतिफचा शिकार ठरला. रहेमान दत्तने त्याचा सोपा झेल घेतला. तिस-या क्रमांकावर आलेल्या हर्ष श्रॉफने 8 चेंडूत 16 धावा काढल्या. त्यानंतर आलेला बबलू पठाण भोपळाही फोडू शकला नाही. पाचव्या क्रमांकावर आलेल्या विकास नगरकरने आपल्या शैलीदार आणि आक्रमक फलंदाजीने स्पर्धेत रोमांच आणला. त्याने नाबाद 47 धावांची विजयी खेळी केली.
त्याला ग्रँड कल्याणच्या क्षेरत्ररक्षकांनी दोन वेळा जीवदान दिल्याचा फटका त्यांना बसला. विकासने 24 चेंडूंचा सामना करताना 7 सणसणीत चौकार आणि 1 उत्तुंग षटकार खेचला. भास्कर जिवरग (2), सय्यद सरफराज (3) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर आलेल्या प्रवीण कुलकर्णीने आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत संघाला विजयी केले. ग्रँड कल्याणतर्फे इनायत सय्यद आणि संदीप सहानीने प्रत्येकी 2 फलंदाज तंबूत पाठवले. तसेच अतिफ शेख आणि प्रदीप जगदाळेने प्रत्येकी एकाला बाद केले.