आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'Divya Premier League',Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अष्टपैलूंचा संघ जितू मोटवाणी चॅलेंजर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तनवाणी (नि:शुल्क शुद्ध पेयजल उपक्रम) प्रस्तुत ‘दिव्य प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेसाठी दिव्य प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी जितेंद्र मोटवाणी यांचा जितू मोटवाणी चॅलेंजर्स संघ स्पर्धेतील सर्वाधिक संतुलिक संघ आहे. विशेष म्हणजे संघातील जवळपास सर्व खेळाडू अष्टपैलू आहेत. संघ गोलंदाजी आणि फलंदाजी ही या संघाची ताकद असून अष्टपैलू खेळाडू हुसेन अमोदी, अमित पाठक यांच्या खांद्यावर संघाची धुरा असेल. संघात आसिफ जब्बार खान, सुशील आराक, इम्रान अली खान, फारूक शेख, सय्यद फरहान आणि गिरिजानंद भगत यासारखे दिग्गज खेळाडू या संघात आहेत. जितू मोटवाणी चॅलेंजर्सविरुद्ध अग्रवाल-ठक्कर एजे स्ट्रायकर्स यांच्यात स्पर्धेचा उद्घाटनीय सामना जिल्हा संघटनेच्या मैदानावर आज दुपारी 12 वाजता होईल. मोटवाणी चॅलेंजर्सचा संघ ‘अ’ गटात सामील झाला आहे.
हुसेन अमोदी, अमित पाठक, सुशील आराक संघाची ताकद
औरंगाबादने निर्माण केलेल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणजे हुसेन अमोदी आणि अमित पाठक होय. अमोदी संघाचा हुकमी एक्का आहे. फलंदाजी व गोलंदाजीत त्याचा कोणीही हात धरू शकत नाही. त्याचप्रमाणे त्याच्यात नेतृत्वगुण आहेत. तो सर्व संघ सहका-यांना सोबत घेऊन चालतो. जबदरस्त फॉर्मात असेलेल्या अमोदीने नुकत्याच झालेल्या जिल्हा साखळी क्रिकेट स्पर्धेत 243 धावा काढल्या आणि 9 बळी घेत स्पर्धेतील अव्वल खेळाडंूमध्ये दुस-या स्थानी राहिला. फलंदाजांमध्ये आपल्या भेदक मा-याने धडकी भरवणारा अमित पाठक. जिल्ह्यातील सर्वात चर्चेतला हा खेळाडू असून अष्टपैलू कामगिरीने त्याने अनेक वेळा संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला आहे. मैदानावर संघ भावना जपणारा आणि ती वाढविणारा खेळाडू आहे. याचा संघाला खूप लाभ होईल. आसिफ जब्बार खान यष्टिरक्षक सलामीवीर फलंदाज आहे.
इम्रान अली खान अष्टपैलू असून डावखुरा मध्यगती गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. सुशील आराक हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. फिरकीपटू असून तो चांगली फलंदाजीही करू शकतो. आक्रमक फलंदाज शेख फारूखमुळे संघाची मधली फळी मजबूत झाली आहे. संघाला जिल्ह्यातील वरिष्ठ क्रिकेटपटू हिदायत खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

आम्ही चांगली लढत देऊ

आमचा जितू मोटवाणी चॅलेंजर्स संघ अतिशय मजबूत आहे. संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. युवा खेळाडू आणि संघभावना हे आमचे शक्तिस्थान आहे. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करू, याचा विश्वास आहे. आम्ही प्रत्येक संघाला चांगली लढत देऊ. आम्हाला रोखणे इतरांना कठीण जाईल.
जितेंद्र मोटवाणी, जितू मोटवाणी चॅलेंजर्स

युवा खेळाडूंची मिळणार साथ
संघात सय्यद नुरूल, सय्यर फरहान, कौसिन कादरीसारखे युवा खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे संघाचे क्षेत्ररक्षण मजबूत झाले. सय्यद फरहानची लेग स्पिन व तडाखेबंद फलंदाजी हे त्याचे वैशिष्ट्य. कौसिन कादरी आक्रमक सलामीवीर आहे. सरफराज पठाणदेखील उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे.