औरंगाबाद - तनवाणी (नि:शुल्क शुद्ध पेयजल उपक्रम) दुस-या ‘दिव्य प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर फुगे सोडून जल्लोष करण्यात आला. या वेळी बंटी तनवाणी यांच्यासह सीटीए संघाचे प्रशांत धुमाळ, विनोद पाटील टायगर्स संघाचे विनोद पाटील, अतिक मोतीवाला, अभय पाटील चिकटगावकर, सान्या इनक्रेडिबल्स संघाचे मिलिंद पाटील, गजानन ऑइल इंडियन्सचे नितीन जाधव, अमोल जाधव, सियारामस् इलेव्हन संघाचे हृषीकेश प्रदीप जैस्वाल, अतुल कांतीकुमार जैन, ग्रँड कल्याण संघाचे गोविंद अग्रवाल, जितू मोटवाणी चॅलेंजर्स संघाचे जितेंद्र मोटवाणी, अग्रवाल-ठक्कर एजे स्ट्रायकर्स संघाचे अनुज अग्रवाल, जयेश ठक्कर, प्रथमेश कन्स्ट्रक्शन संघाचे प्रफुल्ल मांडे, अरिहंत डेव्हलपर्स संघाचे शीतलकुमार कासलीवाल, विनय पाटणी, प्रगती इन्फ्रा संघाचे नीलेश सेठी, संतोष सेठी यांची उपस्थिती होती. या वेळी जिल्हा क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील, व्हेरॉक समूहाचे एम.पी. शर्मा, रवी मसाले समूहाचे फुलचंद जैन, रेड एफएमचे अमित काला, ‘दिव्य मराठी’चे जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, सुभाष बोंद्रे, महेश वशिष्ठ, डेप्युटी एडिटर देविदास लांजेवार, न्यूज एडिटर राजेश शर्मा यांचीही उपस्थिती होती.
मान्यवरांनी लुटला क्रिकेटचा आनंद
उद्घाटन सोहळ्यात मुख्य प्रायोजक माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी फलंदाजी तर अतुल सावे यांनी त्यांना गोलंदाजी करून क्रिकेटचा आनंद लुटला. दोघांनी एकमेकांच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली. इतर मान्यवरांनीही एकेक चेंडू खेळून काढला.