आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'चे शुक्रवारी उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - राजग्रुप प्रस्तुत 'क्रेडाई' आैरंगाबाद आणि 'दिव्य मराठी'च्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल ते मे या काळात जुना बिग बाजार कॉम्प्लेक्स, मोतीवाला स्क्वेअर, आकाशवाणी चौक, जालना रोड येथे 'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'चे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावरच या एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.

घरांच्या किमती स्थिर असल्याने ग्राहकांना 'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'द्वारे घर खरेदीची एक मोठी संधी आहे. आतापर्यंत एक्स्पोमध्ये राज ग्रुप, नभराज ग्रुप, विकास डेव्हलपर्स, गजानन डेव्हलपर्स, जय डेव्हलपर्स, सारा ग्रुप, फेथ बिल्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि., पेंटहाऊस बिल्डर्स, पतंजली, स्टेट बँक ऑफ इंडिया, आर्च डेव्हलपर्स, अमृत डेव्हलपर्स, कल्याणी बिल्डर्स, दिशा ग्रुप, सुंदर कन्स्ट्रक्शन, साऊथ रिपब्लिक, प्राइड ग्रुप आदींनी सहभाग नोंदवला आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक असून सहभागी होऊ इच्छिणारांनी सोमनाथ भंडे ७५०७७७७२१५ मयूर कांबळे ८३९०९०७५३० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गृहप्रकल्पांची माहिती एकाच छताखाली
शहरातीलविविध भागांत सुरू असलेल्या विकासकांच्या गृह प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. गृह कर्जासाठी विविध वित्तीय संस्थांचे स्टॉलही 'दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो'मध्ये उपलब्ध असतील. महापालिका, झालरक्षेत्र, नऊगाव योजना, जळगाव रोड, दौलताबाद रोड, बीड बायपास, पैठण रोड , मिटमिटा परिसर आदी भागात माफक दरात घर उपलब्ध आहेत. घरांच्या किमती मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याने नागरिकांना "अफोर्डेबल हाउसिंग'चा पर्याय उपलब्ध आहे. वन, टू आणि थ्री एचकेसह रो हाऊसेसची मागणी लक्षात घेता विविध गृह प्रकल्पांमध्ये मध्यमवर्गीयांसह उच्च मध्यमवर्गीय त्यापुढील वर्गांसाठीही घरांचा पर्याय उपलब्ध असेल.