आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डिजिटलायझेनशच्या आव्हानाला तोंड देत मराठी वाचन संस्कृती वाढवण्याची गरज'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डिजिटलायझेनशच्या आव्हानाला तोंड देत मराठी वाचनसंस्कृती वाढवण्याची गरज असल्याचे मत मराठी साहित्य, संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, प्रख्यात साहित्यिक बाबा भांड आणि प्रख्यात उद्योजक प्रशांत देशपांडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘दिव्य मराठी’च्या दिवाळी अंकाचे त्यांच्या हस्ते गुरुवारी कौटुंबिक सोहळ्यात आणि थाटात प्रकाशन झाले, या वेळी ते बोलत होते. दिव्य मराठीचे महाराष्ट्राचे संपादक प्रशांत दीक्षित, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर निशित जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

भांड म्हणाले की, ‘इंग्रजी पुस्तकांची विक्रमी विक्री होते ही वस्तुस्थिती आहे. इंग्रजी लेखक, प्रकाशकांनी लहान मुलांना नेमके काय पाहिजे, हे जाणून तशी पुस्तके प्रकाशित केली. त्यांच्यासारखे मराठी लेखक मात्र लिहिताना दिसत नाहीत. मोबाइलवर डिजिटलाइज्ड पुस्तकाचा काही भाग वाचून लोक पुस्तक खरेदी करतात. त्यामुळे लोकांना हवे ते लिहिले जाते की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. इंग्रजी आणि डिजिटलायझेशनच्या आव्हानाला तोंड देत मराठी वाचन संस्कृती वाढवण्याची जबाबदारी प्रकाशक, लेखक आणि वाचन संस्कृतीला पाठिंबा देणाऱ्या सगळ्यांचीच आहे.’

देशपांडे म्हणाले की, ‘मराठी समृद्ध भाषा आहे. पण येणारी पिढी मराठी वाचणार नाही आणि वाचन केले तरी ते मोबाइल किंवा अॅपवरच अशी स्थिती आहे. हे लक्षात घेता मराठी पुस्तकांच्या दुनियेसमोर डिजिटलायझेशनचे मोठे आव्हान आहे. त्यावर मात करून मराठींबद्दल प्रेम कसे निर्माण करता येईल, यासाठी कृती करावी लागेल.’
बातम्या आणखी आहेत...