आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ गणेश महासंघाच्या ढोल पथक स्पर्धेत पतित पावन संघ विजेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशोत्सवा निमित्त‘दिव्य मराठी’ आणि जिल्हा गणेश महासंघातर्फे आयोजित ढोल पथक स्पर्धेत छावणीच्या पतित पावन ढोल पथकाने २५ हजार एक रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले. स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवारी रात्री वाजता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले.
द्वितीय क्रमांक (१५ हजार एक रुपये) शिवाजीनगर येथील विघ्नहर्ता पथकाने मिळवला. तिसरा क्रमांक (९९९९ रुपये) ज्योतीनगरातील मोरया गणेश मंडळ आणि पदमपुऱ्यातील बाल गजानन मित्रमंडळाला विभागून देण्यात आला. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या संघांनी सायंकाळी सादरीकरण केले. परीक्षक म्हणून नाशिक येथील प्रख्यात संगीतकार धनंजय धुमाळ होते. बक्षीस वितरणास औरंगाबाद जिल्हा गणेश महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, स्वाद थाळीचे अशोक शहा, ओरो कैबचे जितू मोटवाणी, जाधव मंडप आणि डेकोरेटर्सचे रखमाजी जाधव, एसएस प्रो आणि नॉर्थन प्रो लाइट्सचे स्वरूप प्रीतम गोसावी, अभिजित तसेच प्रोझोनचे जितेंद्रसिंग सलुजा आदींची उपस्थिती होती. हेमंत पवार यांनी सूत्रसंचालन केले. ‘दिव्य मराठी’ ब्रँडिंगचे स्टेट हेड अदनान कनोरवाला यांनी आभार मानले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी बाळू औताडे, बबलू वानखेडे, अभिजित थोरात, दत्ता आगे, सतीश इंगळे, वैभव औताडे, संदीप सपकाळ, संदीप शेळके आदींनी सहकार्य केले.
या वेळी औरंगाबाद जिल्हा महासंघाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, ज्येष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ, दै. दिव्य मराठीचे युनिट हेड अमित डिक्कर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन, गणेश महासंघाचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, नंदू घोडेले, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे, बाळासाहेब थोरात, नगरसेवक शिवाजी दांडगे, सभापती राजेंद्र जंजाळ, विनोद पाटील, प्रशांत म्हस्के यांच्यासह स्वाद व्हेज रेस्टॉरंटचे चिंतन शहा, अशोक शहा, ओरो कॅबचे संचालक जितू मोटवानी, जाधव मंडप डेकोरेटर्सचे रखमाजी जाधव, स्वरूप प्रीतम गोसावी, प्रोझोन मॉलचे जितेंद्रसिंग सलुजा आदींची उपस्थिती होती.

या वेळी सर्वोत्कृष्ट ढोलपथक स्पर्धेचे उद््घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन यांच्या हस्ते ढोलपूजनाने करण्यात आले. यानंतर ढोलपथक स्पर्धेत सुरुवातीला ताई प्रतिष्ठान संचालित शिवछत्रपती ढोलपथकाने आपल्या खास शैलीत ढाेल-ताशांच्या संगतीने ढोलवादन केले. या पथकात मुलींनीसुद्धा सहभाग घेऊन उत्कृष्टरीत्या ढोलवादन केले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ....गणपती बाप्पा मोरया...जय श्रीराम, जय हनुमान अशा घोषणांत ढोल-ताशांची सांगड घालत उत्कृष्ट सादरीकरण केले. यानंतर विघ्नहर्ता क्रीडा मंडळ औरंगपुरा गोकुळवाडी यांच्या पथकाने सहा ताशांचे आकर्षकरीत्या वादन केले. ताशांचा गजर अन् ढोलचा डंका यातून निघणाऱ्या आवाजातून संपूर्ण प्रोझाेन मॉलचे वातावरण बदलून टाकले. या वेळी सर्वाेत्कृष्ट ढोलपथक स्पर्धेचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ संगीतकार धनंजय धुमाळ यांनी काम पाहिले. स्पर्धेत २० ढोलपथकांनी सहभाग नोंदवला.

यापथकांचा होता सहभाग :सर्वोत्कृष्ट ढोलपथक स्पर्धेत ताईसाहेब प्रतिष्ठान संचालित शिवछत्रपती ढोलपथक, विघ्नहर्ता क्रीडा मंडळ औरंगपुरा-गोकुळवाडी, आमची संस्कृती ढोलपथक, संघमित्र ढाेलपथक तिसगाव, मोरया रे गणेश मंडळ एन-१२ स्वामी विवेकानंदनगर, रोकडा हनुमान संस्थान ढोलपथक, यांच्यासह इतर पथकांचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...