आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४०० जणांना दूध वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "दिव्य मराठी'च्या अभियानाला प्रतिसाद देत लायन्स क्लब ऑफ डायमंड, कुलस्वामनिी मंगल कार्यालयातर्फे ितसर्‍या श्रावण सोमवारी ४०० जणांना दुधाचे वाटप करण्यात आले. ओंकारेश्वर मंदिर, खडकेश्वर मंदिर, बजरंग चौकातील महादेव मंदिर, शविाजीनगर येथील मंदिरातून पिंडीवर प्रतीकात्मक अभिषेक करून उर्वरित दुधाचे वाटप करण्यात आले.
डायमंडचे अध्यक्ष वलिास कोरडे यांनी सकाळी नऊ वाजता दूध वाटप केले. विशेष म्हणजे ड्रायफ्रूट्स असलेले मसाला दूध वाटप करण्याआधी देवाला नैवेद्य दाखवण्यात आला. अमृततुल्य दूध वाया जाण्यापेक्षा कुणाच्या तरी उपयोगी यावे, असा विचार "दिव्य मराठी'ने दिला होता. याला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी सर्वांनी दूधाचे शास्त्रीय तसेच आहारविषयक महत्त्व पटवून दिले. या वेळी अशोक कुलकर्णी, अच्युत कुलकर्णी, बाळू मिरकुटे, वैभव कोरडे, सतीश मापारी, राजेंद्र वाघमारे उपस्थित होते. ज्योतीनगर परिसरातील मंदिरात महलिा मंडळाने ५० जणांना तर खडकेश्वर मंदिरातही शालेय वदि्यार्थ्यांना दूध वाटप करण्यात आले.