आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठीतर्फे औरंगाबाद फूड अवॉर्ड् सचे आयोजन, खाद्यपदार्थ विक्रेत्यांसोबत खवय्यांनाही मेजवानी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादेतील चविष्ट खाद्यपदार्थांची माहिती खवय्यांना व्हावी यासाठी ‘दिव्य मराठी’तर्फे औरंगाबाद फूड अवॉर्ड््सचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्यांना पारितोषिके दिली जााणार आहेत.
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण शहर असलेल्या औरंगाबादेत खाद्य संस्कृतीही रुजली आहे. अनेकविध प्रकारचे चविष्ट, रुचकर खाद्य पदार्थ येथे मिळतात. त्याची माहिती संपूर्ण औरंगाबाद शहराला तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना व्हावी, या उद्देशाने “दिव्य मराठी’ने फूड अवॉर्ड््सचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा प्रारंभ ऑगस्ट रोजी झाला असून १४ ऑगस्ट रोजी हॉटेल अजंता अॅम्बेसेडर येथे होणाऱ्या सोहळ्यात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचे निवृत्त प्रोफेसर खाद्य संस्कृतीचे अभ्यासक पुष्पेश पंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. ऑक्सिड्यू आणि माँगिनीजच्या सहकार्याने तसेच रवी मसालेच्या सहप्रायोजकत्वाने हा उपक्रम होत आहे. हॉटेल अजंता अॅम्बेसेडर, ड्रीम्स क्रिएशन, हॅथवे एमसीएन सहभागीदार आहेत.

या उपक्रमात शहरातील सर्वोत्तम १५ खाद्य प्रकार लोकप्रियतेच्या निकषावर निवडण्यात आले आहेत. एका खाद्य प्रकारात तीन हॉटेल्स, फूड शॉप्स आहेत. म्हणजे एकूण ४५ ठिकाणी ९०० पेक्षा अधिक मोफत फूड पासेसवर तेथील पदार्थांचा आस्वाद “दिव्य मराठी’च्या वाचकांना तसेच उपक्रमात सहभागी झालेल्या हॉटेल, फूड शॉप्ससाठी मतदान करणाऱ्यांना मिळणार आहेत. पारितोषिक वितरण सोहळ्यात मराठमोळ्या, भारतीय खाद्यांविषयी प्रश्नमंजूषा, महिलांसाठी कुकिंग वर्कशॉप, अवॉर्ड नाइट होणार आहे. अधिक माहितीसाठी ९५४५५४१९१७, ८३९०९०७८२० या क्रमांकांवर संपर्क साधावा.

अवॉर्ड मेनू असा
१. सर्वोत्कृष्ट भारतीय थाळी, २. सर्वोत्कृष्ट मिसळ, ३. सर्वोत्कृष्ट चाट, ४. सर्वोत्कृष्ट आइस्क्रीम पार्लर, ५. सर्वोत्कृष्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट, ६. सर्वोत्कृष्ट व्हेज रेस्टॉरंट, ७. सर्वोत्कृष्ट चायनीज रेस्टॉरंट, सर्वोत्कृष्ट पान शॉप, ९. सर्वोत्कृष्ट पावभाजी, १०. सर्वोत्कृष्ट बेकरी आऊटलेट, ११. सर्वोत्कृष्ट स्वीटमार्ट, १२. सर्वोत्कृष्ट ज्यूस सेंटर, १३. सर्वोत्कृष्ट चहा स्टॉल, १४. सर्वोत्कृष्ट ढाबा, १५. सर्वोत्कृष्ट फरसाण.
बातम्या आणखी आहेत...