आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: अवघ्या १० टक्के वेळ-खर्चात दोन धरणांइतका पाणीसाठा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात भंडारदरासारखी आणखी दोन किंवा निळवंडेसारखी तीन धरणे बांधून जेवढे पाणी सिंचनासाठी साठले असते त्याहून जास्त पाणी जलयुक्त शिवार याेजनेतून अवघ्या काही महिन्यांत साठले. विशेष म्हणजे या धरणांच्या कामासाठी किमान ४५०० कोटी रुपये खर्च आला असता. शिवाय धरणांत इतके पाणी अडवण्यासाठी किमान १० ते १५ वर्षे आणि शेकडो हेक्टर जमीन वाया गेली असती. अवघ्या १० टक्के रकमेत आणि १० महिन्यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून राज्यात जलसिंचनाचे मोठे काम उभे राहिले आहे.

राज्य सरकारने राज्यभर जलयुक्त शिवार अभियान राबवले. सव्वासहा हजार गावांत सव्वा लाख कामे पूर्ण केली आहेत. यामुळे एकूण २४ टीएमसी पाणी साठले आहे. इतके पाणी धरणात साठवायचे तर त्यासाठी भंडारदरासारखी किमान दोन, निळवंडेसारखी तीन धरणे बांधूनही इतके पाणी साठणार नाही.
जलयुक्तची जलक्रांती
{ जलयुक्तने राज्यात ६० टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या जिल्ह्यांना तारले.
{राज्यात ६२०० गावांत जलयुक्त शिवारची कामे. २४ टीएमसी पाणीसाठा.
{६ ते ७ लाख हेक्टर शेती योजनेतून ओलिताखाली. भूजलपातळीही वाढली.जलयुक्त जलक्रांती.
किमान ४५०० कोटींचे काम
तज्ज्ञ अभियंत्यांच्या मते, आज ८ टीएमसी क्षमतेचे धरण बांधायला किमान १५०० कोटी रुपये खर्च येतो. अर्थात, हा खर्च केवळ धरणाची भिंत बांधणे आणि जमीन अधिग्रहित करणे यासाठीचाच असतो. कालवे बांधण्यासाठी किमान तेवढाच खर्च येतो, असा अनुभव आहे. सध्या राज्यात २४ टीएमसी पाणी साठवले गेले आहे. त्याची तुलना धरणांच्या आकडेवारीशी केली तर िकमान १५०० कोटी रुपये आजच्या किमतीप्रमाणे लागतील. त्यात १० ते १२ वर्षांचा कालावधी गृहीत धरला तर ही रक्कम किती मोठ्या प्रमाणात वाढेल, याचा अंदाज येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...