आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: देशभक्ती, लष्करी जवानांच्या शिस्तीचे पर्यटनातून दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सैन्याचे आकर्षण, कडवी शिस्त युवकांना अनुभवता यावी आणि यातूनच माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने राज्यातील सैनिक कल्याण विभागाने देशात प्रथमच सुरू केलेल्या ‘मिलिटरी टुरिझम’ या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळत अाहे. या माध्यमातून जम्मू- काश्मीर, पूर्वोत्तर राज्ये, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमा आदी कडेकाेट लष्करी सुरक्षा असलेल्या भागात पर्यटन करण्याची संधी सामान्य नागरिकांना मिळत अाहे. इतर राज्यातही ही संकल्पना चांगलीच रुजली अाहे.

या सहलींमध्ये लष्कराची विविध प्रशिक्षण केंद्रे, म्युझियम, पायदल, हवाईदल, नौदल आदींचे प्रमुख केंद्र, विविध सीमा, अकादमी, आदींमध्ये कसे कामकाज चालते हे दाखवले जाते. राज्याच्या सैनिक कल्याण संचालनालयाने चार गटांत मिलिटरी टुरिझमची संकल्पना आखली. पहिली ते सातवीमधील विद्यार्थी (३ दिवस), आठवी ते दहावी (४ दिवस), महाविद्यालयीन विद्यार्थी (७ दिवस) आणि कार्पोरेट क्षेत्र (१०) असा पर्यटन कालावधी अाहे.
प्रवासाचा खर्च, राहणे, निवास हे अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. टुरिझमसाठी किमान २० ते कमाल हजार सदस्यांचा गट असणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात महाड आणि अलिबाग येथे सैनिक कल्याण विभागाने पर्यटकांसाठी विश्रामगृह उघडले आहे. घोरपडी (पुणे) येथेही सुमारे दीडशे जणांची व्यवस्था होईल, असे सुसज्ज विश्रामगृह सैन्याशी संबंधित नसलेेल्या व्यक्तींना देण्यास सुरुवात झाली आहे.

व्यावसायिक दृष्टिकोन नाही
^केवळव्यावसायिकदृष्टिकोनावर ही संकल्पना नसून, माफक दरात सुविधा पुरविणे आणि सैनिक पर्यटन करणे हा यामागचा हेतू आहे. युवकांमध्ये शौर्य निर्माण व्हावे तसेच सैन्य कुठल्या परिस्थितीत काम करते याचा अनुभव देशवासीयांना यावा. माजी सैनिकांना काही प्रमाणात रोजगार मिळावा असा तिहेरी संगम साधला आहे. कर्नलसुहास नाईक, व्यवस्थापक (टुरिझम).

यशस्वी आयोजन
सैनिककल्याण संचालनालयाने यंदा चारधाम आणि अमरनाथ यात्रेचे आयोजन केले होते. अमरनाथसाठी १२७ भाविक सहभागी झाले होते. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) पुणे येथे राज्याबाहेरील १२ शाळांनी भेट घडवून आणली. रायगडावर दोनशे नागरिकांना पुढील महिन्यात नेले जात आहे. वायुदिनानिमित्त ऑक्टोबरला अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाचशे विद्यार्थ्यांना पुणे हवाई दलाचे सेंटर दाखवण्यात येणार आहे. लढाऊ विमाने कशी उडतात, त्यांची देखभाल दुरुस्ती कशी चालते , रात्री उड्डाण कसे होते, मिसाइल कसे लोड करतात आदींचा त्यात अंतर्भाव असतो. डिसेंबरला नौदल दिनानिमित्त लोणावळा मुंबई येथील नेव्ही सेंटरमध्ये तरुणांचा एक गट नेण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...