आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग दत्ताने काढलेले चित्र ठरले मनपाच्या स्पर्धेचे आकर्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मनपाच्या वतीने शनिवार, जानेवारी रोजी सिद्धार्थ उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात देवगिरी शाळेतील आठवी वर्गात शिकणाऱ्या दत्ता थेटे या अंध विद्यार्थ्याने काढलेले निसर्गचित्र सर्वांचे आकर्षण ठरले. सर्वसामान्यांना लाजवेल असे निसर्गचित्र काढल्याने सर्वांनी त्याचे कौतुकही केले. चित्रांतून मुलांनी लेेक वाचवा लेक शिकवा, स्वच्छता अभियान, कॅशलेस व्यवहार, पाणी बचतीचा संदेश दिला. या स्पर्धेत साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आणि परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यांतील शासकीय, निमशासकीय सर्व माध्यमांच्या शाळांनी यात सहभाग नोंदवला. सकाळी वाजता या स्पर्धेचे उद्घाटन  महापौर भगवान घडामोडे आणि उपमहापौर स्मिता घोगरे यांच्या उपस्थितीत पार पडले. यात वर्ग चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आणि असे दोन गट तयार करण्यात आले होते. गटासाठी चिमण्यांसाठी पाणी व्यवस्था, परिसर स्वच्छता, पाणी बचत, पानफुलांवरील पक्षी, निसर्गचित्र असे विषय होते. गटासाठी लेक वाचवा लेक शिकवा, स्वच्छ भारत अभियान, औरंगाबाद पर्यटननगरी, कॅशलेस व्यवहार आणि महाराष्ट्रातील किल्ले असे विषय देण्यात आले होते. 
 
यात ‘अ’ आणि ‘ब’ गटांसाठी प्रथम पुरस्कार पाच हजार रुपये, द्वितीय पुरस्कार तीन हजार, तर तृतीय बक्षीस १५०० रुपये ठेवण्यात आले आहेत. तसेच दोन्ही गटांतील दहा उत्तेजनार्थ विजेत्यांना प्रत्येकी पाचशे रुपये सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उद््घाटनप्रसंगी सभागृहनेते गजानन मनगटे, महिला बालकल्याण समिती सभापती अर्चना नीळकंठ, उपायुक्त रवींद्र निकम, उद्यान अधीक्षक विजय पाटील, जनसंपर्क अधिकारी अहेमद तौसिफ आदींची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशासाठी कला दालनचे व्यवस्थापक मधुकर गंगावणे, प्राचार्य एम. एस. भोईर, अमोल देवडे, राजा रविवर्मा, संजीव सोनार, संजय मरगट आदींनी प्रयत्न केले. 
 
२३ जानेवारी रोजी होणार पुरस्कार वितरण 
स्पर्धेचा निकाल २३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार असून याच दिवशी दुपारी चार वाजता मनपाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या कलादालनात बक्षीस वितरणही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ३०० उत्कृष्ट चित्रांचे प्रदर्शनही २३ ते २६ जानेवारीदरम्यान भरवण्यात येणार आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...