आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादकरांना \'दिवाळी पहाट’ची मेजवानी; राहुल देशपांडे, महेश काळे यांची सुरेल मैफील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अभ्युदय फाउंडेशनद्वारा आयोजित 'दिपोत्सव दिवाळी पहाट’मध्ये मंगळवारी (17 ऑक्टोबर) औरंगाबादकर रसिकांना सुरेल मैफीलीची मेजवानी अनुभवता येणार आहे. 'दिवाळी पहाट'मध्ये यंदा प्रथमच सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि महेश काळे यांचे एकत्रित सादरीकरण होणार आहे. एकीकडे दिवाळीच्या फराळाची लज्जत तर दुसरीकडे औरंगाबादकर रसिकांसाठी ही सुरेल मेजवानी ठरणार आहे. 

अभ्युदय पाउंडेशनद्वारे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम शहरातील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या आवारात होणार असून दरवर्षीप्रमाणे सकाळी ठीक सहा वाजता कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमाची सुरूवात प्रसिध्द शहनाईवादक कल्यान आपार यांच्या सुरांनी होईल. त्यानंतर अंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दोन्ही गायकांच्या सुमधूर गीतांनी औरंगाबादकरांची पहाट सुरमयी होणार आहे.

अभ्युदय फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश राऊत यांनी रसिकांनी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमासाठी सुबोध जाधव, मंगेश निरंतर, गणेश घुले, दीपक जाधव, श्रीकांत देशपांडे, महेश अचिंतलवार आणि मयूर देशपांडे परिश्रम घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...