आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळी फराळासाठी दररोज ५० टन पोहे, मुरमुऱ्याची आवक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दिवाळीच्या फराळासाठी पोहे, मुरमुरे, शेंगदाणे, तेल, रवा, साखर, डाळ विविध वस्तूंच्या खरेदीला वेग आला आहे. राज्य आणि परराज्यातून दररोज जुन्या मोंढ्यात पाच ट्रक म्हणजे पन्नास टनांपेक्षा जास्त पोहे, मुरमुऱ्यांची आवक होत आहे. सहा प्रकारचे मुरमुरे आणि पोहे विक्रीसाठी बाजारपेठेत अपलब्ध आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत असल्याने वस्तूंच्या भावात काही प्रमाणात चढ-उतार होत आहेत.
पॅकिंग चाळीस ग्रॅम शेव मुरमुरे, पोहा मुरमुरे खरेदीसाठी पाच रुपये लागतात. मात्र, पॅक केलेल्या वस्तू कधी तयार केल्या आहेत, तेल मुरमुरे, पोहे, शेवसाठी बेसन पीठ कोणते वापरले, याविषयी ग्राहकांना माहिती नसते. छापलेली तारीख बहुतांश ग्राहक बघत नाहीत. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शेव चिवडा, मुरमुरा पोहा चिवडा, बेसन लाडू, चाचणीचे रवा लाडू, मैदा लाडू, मोतीचूर लाडू, चकल्या, गुलाब जामून, बाजऱ्याचे खजूर, शंकरपाळे आदी फराळाचे पदार्थ घरीच तयार केले जातात. त्यामुळे रवा, मैदा, साखर, मुरमुरे, पोहा, शेंगदाणे, बेसन पीठ, डाळी या वस्तूंची मागणी वाढली आहे. त्यासाठी सांगली, कोल्हापूर आणि गुजरातमधून दररोज शंभर टनांच्या वर आवक होत आहे. त्यापैकी राजनांदगाव गुजरातमधील नवसारी येथील पन्नास टन पोहे, मुरमुऱ्याचा समावेश आहे.

भावातचढ-उतार...
मागणी पुरवठा यांचा समतोल साधण्यासाठी दररोज १०० टनांपेक्षा अधिक विविध वस्तूंची आवक होत आहे. यामुळे शेंगदाणे ते १५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. बेसन पीठ हरभऱ्याची डाळ १३० रुपये प्रति किलो आहे. भारी भडंग पोहा १०० किलो आहे, अशी माहिती विक्रेते धर्मचंद्र बोथरा, सुधीर सावजी यांनी, तर वनस्पती तूप पाच रुपयांनी महागल्याचे जगनाथ बसैये यांनी दिली.

पोहे त्याचे प्रकार
जाडपोहे ~३४
कांदापोहे ~३८
पातळपोहे ~४४
दूधपोहे ~८०
टिकलीपोहे ~६०
क्रांतीपोहे ~५०
सहा प्रकारचे मुरमुरे
भाजके मुरमुरे ~४०
पाणी ~५५
घोटी ~७०
बासमती भडंग ~८५
भारी भडंग ~१००
बदाम भाजका ~७०
किमती अशा
हरभराडाळ १२० ते १३०
मूगडाळ ~८०
रवा २८, पॅकिंग ~३२
मैदा २८, पॅकिंग ~३४
साखर ~३७ ते ३८
शेंगदाणे ~९५
बेसन पीठ ~१३०
लसूण ~१५०
कांदा ~१०
कोथिंबीर १० जुडी
बातम्या आणखी आहेत...