आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजे वरातीत नकाे, मंगल कार्यालयात वाजवा, आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लग्नाच्या वरातीत रस्त्यावर चालणारा धांगडधिंगा औरंगाबादेत दिसणार नाही. लग्नानिमित्त वाजवली जाणारी वाद्ये केवळ मंगल कार्यालयाच्या आवारातच वाजतील. त्यांचाही आवाज ७५ डेसिबलपेक्षा कमी हवा, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. लेखी आदेश निघताच शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होईल.

बुधवारी मंगल कार्यालय व डीजे साउंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्तांनी हे आदेश दिले. वाद्यांच्या तालावर रस्त्यावर नाचता येणार नाही. वाहतुकीला अडथळा येता कामा नये. लग्नात वाद्ये वाजवून नक्कीच आनंद साजरा झाला पाहिजे; पण रस्त्यावर नाही. मंगल कार्यालयाच्या आवारात ७५ डेसिबलपेक्षा कमी आवाजात पारंपरिक वाद्यांना मुभा राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वऱ्हाडींच्या मोटारी जप्त करणार
>वऱ्हाडींच्या मोटारी रस्त्यावर लागणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. पार्किंगची व्यवस्था करा.
>वरात मंगल कार्यालयात येत असताना त्यांच्यासाठी पांढऱ्या पट्ट्या मारून एक जागा निश्चित करावी.
>रस्त्यावर वाहने उभी राहिल्यास वऱ्हाडींच्या मोटारी जप्त करण्याबरोबरच, कार्यालयाच्या व्यवस्थापनावरही गुन्हे नोंदवले जातील.
बातम्या आणखी आहेत...