आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश डावलून 'आवाज' चढले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिसांच्या साक्षीने दहीहंडी महोत्सवाच्या आयोजकांनी सर्वोच्च न्यायालयाचा ६५ डेसिबल्सचा नियम पायदळी तुडवला. स्वाभिमान क्रीडा मंडळ वगळता अन्य आयोजकांनी १२ वर्षांखालील गोविंदांचाही वापर केला. पोलिसांनी कुणालाही रोखले नाही. डेसिबल्स मापक यंत्रात आवाजही मोजला नाही. दुसरीकडे थरांच्या मनाईला स्थगिती मिळाल्याने आयोजक, गोविंदांसह दहीहंडीप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. शहरातील सर्व प्रमुख चौक गर्दीने फुलून गेले होते.
विधानसभा नविडणुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रदीप जैस्वाल, अतुल सावे, विनोद पाटील, राजगौरव वानखेडेंनी यंदा दहीहंडीचा महोत्सव कॅश करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यांना न्यायालयाच्या निर्णयाचे भानच राहिले नाही. दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी गुलमंडी, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, पुंडलिकनगर, बजरंग चौक आवाजाने दणाणून टाकले. १२ वर्षांखालील गोविंदांना हंडी फोडण्यासाठी वापरू नये, हा न्यायालयाचा आदेशही धाब्यावर बसवण्यात आला. गाद्या वापरल्या तर पायांना ग्रीप मिळत नाही, असे गोविंदा पथकांचेच म्हणणे असल्याचेही संयोजकांकडून सांगण्यात आले.
सहा थर
आयोजकांनी नऊ थरांवर हंड्या लावल्या होत्या. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही तेथपर्यंत मजल गाठणे गोविंदांना शक्य झाले नाही. त्यामुळे हंड्या सहा थरांपर्यंत खाली आणण्यात आल्या. रणयोद्धा, जय भोले, राजाबाजार, वीर बलराम, राजयोग, गोगानाथ बाबा, जबरे हनुमान, जय भद्रा आदी पथकांनी सहा थर लावले. आविष्कार कॉलनीत महिला गोविंदा पथकानेही लक्ष वेधले.
पाण्याचा मारा झेलण्यासाठीही स्पर्धा
गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने चारच थर लावावेत आणि १८ वर्षांखालील गोविंदांचा वापर करू नये, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे दहीहंडी आयोजक, गोविंदा पथकांमध्ये निराशेचा सूर उमटत होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलासा िदल्यावर निराशेचे रूपांतर अपूर्व उत्साहात झाले. यंदाही हा उत्सव पाहण्यासाठी हजारो तरुण-तरुणींची गर्दी झाली होती. गोविंदांवर होणारा पाण्याचा मारा अंगावर घेण्यासाठी प्रेक्षकांमध्येही स्पर्धा सुरू होती. सनिेगीतांच्या तालावर ठेका धरला जात होता.
ईशा, प्रियाची हजेरी ठरली प्रमुख आकर्षण
अभिनेत्री ईशा गुप्ता आणि प्रिया मराठे, ऋजुता देशमुख यांची हजेरी प्रमुख आकर्षण ठरली. त्यांना पाहण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली होती. ईशाने फक्त अभिवादन केले. मात्र, प्रिया आणि ऋजुताने संवाद साधला. तुम्हा सर्वांच्या उत्साहाला आलेले उधाण पाहून आम्ही भारावून गेलो आहोत, असे त्यांनी सांगितले. पूर्वमधून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले अतुल सावे यांनी यापुढील काळातही माझ्यावरील प्रेम कायम ठेवा, असे राजकीय आवाहन केले.
अधिकार्‍यांवर जबाबदारी
आवाज मोजण्याची आणि १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेले गोविंदा आढळल्यास आयोजकांवर कारवाई करण्याची जबाबदारी दोन पोलिस उपायुक्तांकडे आहे. ते त्यांची कामगिरी नियमानुसार बजावतील.'
राजेंद्रसिंग, पोलिस आयुक्त
डेसिबलचे यंत्र गायब
पोिलसांतर्फे ६५ डेसिबल्सपेक्षा अधिक आवाजासाठी मज्जाव करण्यात आला. त्यानुसार आवाज मोजणीचे यंत्र पोलिसांकडे होते. प्रत्यक्षात डेसिबल मोजणारे यंत्र घेऊन कोठेही पोलिस दिसले नाहीत. विचारणा केली असता ते दुसरीकडे असल्याचे सांगितले.