आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Do Financial Activities Through Banks City Police Commissioner

आर्थिक व्यवहार बँकेद्वारेच करा : पोलिस आयुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - व्याजाने पैसे देणे-घेणे, कमी व्याजदरात कर्ज काढून देणे, भिशीचा व्यवहार करणे याशिवाय आर्थिक देवाणघेवाणीमुळे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनेकांनी पोलिस आयुक्तालयात धाव घेतली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून नागरिकांनी कोणताही व्यवहार करताना बँकेद्वारेच करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.
आयुक्तांनी याविषयी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना काही सूचना केल्या.
देवाणघेवाणीच्या प्रकारातून होत असलेल्या फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी कोणताही आथिक व्यवहार हा बँकेद्वारे केलेला बरा, असे आयुक्तांनी आवाहन केले. कोणी योजनेच्या नावाखाली आमिष दाखवून कमी दराने कर्ज देत असेल तर त्याचा उद्देश फसवणुकीचाच असतो. यामुळे अशा अामिषाला कुणीही बळी पडू नये. आथिक व्यवहारामुळे आज बऱ्याच लोकांचे राहते घरही त्यांच्या हातातून गेले आहे. त्यामुळे जे काही प्रकार चालत अाहेत ते चुकीचे आहेत. वस्तूंची ऑनलाइन विक्री होत आहे. काही फसव्या कंपन्या आहेत, त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.