आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी महिनाभर धडक तपासणी मोहीम- जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ तसेच नाशिक जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भपाताची प्रकरणे निदर्शनास आल्याने शासनाने १५ मार्च ते १५ एप्रिल अशी महिनाभर धडक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
 
नागरी ग्रामीण या दोन्ही स्तरांवर जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आरोग्य विभाग, महानगरपालिका आरोग्य विभाग, अन्न औषध प्रशासन यांच्या संयुक्त समितीमार्फत मनपा आणि पालिका आणि ग्रामीण भागात अधिकाऱ्यांच्या समित्या नेमून ही धडक मोहीम राबवली जाईल. 
 
गर्भधारणापूर्व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत जिल्ह्यात कोणत्याही नोंदणीकृत, अनोंदणीकृत केंद्रातील डॉक्टर किंवा अन्य कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या कायद्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. 
 
अशा गुन्ह्याबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंचवीस हजार रुपये बक्षीसही देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अशा केंद्राविरुद्ध www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर तसेच १८००२३३४४७५ या टोल फ्री हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येईल. तसेच १०४ या टोल फ्री नंबरवरही तक्रार नोंदवता येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. गायकवाड यांनी सांगितले. 
 
अशी आहे शहरातील स्थिती 
औरंगाबाद शहरात या कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या ३१९ सोनोग्राफी केंद्रांपैकी २०९ सोनोग्राफी केंद्रे सुरू आहेत. महानगरपालिकेच्या अंतर्गत १३१ एमटीपी सेंटर चालू आहेत, अशी माहिती मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...