आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना आळशी बनवू नका, स्ट्रगल करू द्या, इन्फोसिसचे व्यवस्थापक जोसेफ मानिस यांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थ्यांना त्यांचा बोयोडेटा तयार करू द्या. येथे जॉब करू नको, तेथे जॉब करू नको, असे सल्ले देणेही घातकच आहे. त्यांना सर्व काही जागेवर देऊन आळशी बनवू नका, त्यांना त्यांचा स्ट्रगल करू द्या, असा सल्ला इन्फोसिसचे व्यवस्थापक जोसेफ मानिस यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना दिला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील इन्फोसिस कंपनीत सहा वर्षांपूर्वी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल शिकवण्याबाबत सामंजस्य करार झाला. याचाच भाग म्हणून सोमवारी १० जानेवारी रोजी वाळूज येथील आयसिम अभियांत्रिकी महाविद्यालय पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीसाठी जाताना काय काळजी घ्यावी, सॉफ्ट स्किलचे तंत्र कसे शिकावे याच्या टिप्स दिल्या. जोसेफ म्हणाले की, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेताना हे प्रशिक्षण घेतलेच पाहिजे. पुणे मुंबई शहरातील विद्यार्थ्यांसह इतर शहरी भागातील विद्यार्थ्यांना मुलाखतीला जाताना फारसा त्रास होत नाही. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थी अभ्यासात हुशार असूनही केवळ सॉफ्ट स्किल नसल्याने मुलाखतीत कमी पडतात अन् त्यांना नोकरी मिळत नाही. 

७० महाविद्यालयांची निवड : यावेळी मराठवाड्यातील ७० महाविद्यालयातील प्राध्यापकांना पुणे येथील कंपनीच्या मुख्यालयात बोलावून प्रशिक्षण दिले. त्यांचे कामकाज कसे सुरू आहे, हे पाहण्यासाठी जोसेफ आले होते. या वेळी डॉ. गिरीश काळे, आयसिमाचे संचालक प्रा. दिलीप गौर, प्रा. आशिष जहागीरदार उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनाच नोकरीचा मार्ग शोधू द्या 
जोसेफ प्राध्यापकांना उद्देशून म्हणाले की, विद्यार्थ्यांना त्यांचा बायोडेटा तयार करण्यापासून अगदी कोणत्या कंपनीत नोकरी करायची याचे मार्गदर्शन प्राध्यापक करतात. तसे करता त्यांना त्यांचा मार्ग शोधू द्या. आपल्या प्रयत्नाने नोकरी शोधू द्या, तरच ते तयार होतील.