आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाचा दुरुपयोग करू नये - एसडीओ बारावकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर आज होताना पाहायला मिळतो. विद्यार्थ्यांनी आणि अन्य सर्व स्तरांतील व्यक्तीही याचा सर्रास वापर करतात; परंतु या माध्यमाचा वापर करताना तरुणींनी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्ही त्या व्यक्तींच्या आमिषाला बळी पडणार नाहीत. या माध्यमापासून जेवढे दूर राहता येईल, तेवढे दूर राहण्याचा युवक-युवतींनी प्रयत्न करावा, असा सल्ला उपविभागीय पोलिस अधिकारी कल्पना बारावकर यांनी दिला. त्या करमाड येथील राजीव गांधी महाविद्यालयात करमाड ठाणे व राजीव गांधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
या वेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक आडे, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शांताराम सावंत, प्राचार्य एल. जी. दांडगे आदी उपस्थित होते. या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्या म्हणाल्या, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता यांसारख्या शहरांतील महिलाच विविध आमिष दाखवत महिलांना वेश्या व्यवसायात ओढतात. त्यासाठी अशा महिलांपासून युवतींनी दूर राहावे. तसेच फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपचा अतिवापर टाळावा. मुलींनी सद्सदविवेकबुद्धीचा वापर करून स्वत:चे संरक्षण करण्यास शिकले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तसेच 354 376, 409, 498 या कलमांसंदर्भात सविस्तर माहितीही त्यांनी सांगितली. या वेळी पोलिस कर्मचारी मुक्तेवार यांनी कराटेचे प्रात्यक्षिक दाखवले. तसेच विद्यार्थ्यांना विविध हत्यारांविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. डॉ. बाळासाहेब लिहिणार, प्रा. अर्जुन चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.