आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नका : जिल्हाधिकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी केले आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रध्वजाविषयीचे प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरिता विद्यार्थी नागरिकांकडूनदेखील राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.
कागदी प्लास्टिकचे छोटे राष्ट्रध्वज विविध सार्वजनिक ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. रस्त्यात इतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज बरेच दिवस नष्ट होत नाहीत. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरिता प्लास्टिकच्या वापरास मान्यता नाही. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१ तसेच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे. राष्ट्रध्वज हा हातमाग कापडापासून अथवा हातांनी विणलेल्या ऊन, कापड अथवा रेशमी कापडाचा वापरावा. तो आयताकृती असावा. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरू नये. खराब झालेले, मैदानात अथवा रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका जिल्हास्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत.