आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाल्यांवरील बांधकामांचे सर्वेक्षण करा : महापौर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुख्य मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम ४० टक्के पूर्ण झाले असले तरी शहरांतील अनेक नाल्यांवर अतिक्रमणे असल्याने तेथे ही पाइपलाइन टाकता येत नाही. त्यामुळे या बांधकामांचे सर्वेक्षण आठ दिवसांत करून त्यांची यादी करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी आज दिले. भूमिगत गटार याेजनेच्या कामाचा आढावा महापौरांनी एका बैठकीत घेतला. या वेळी ठेकेदारांनी शहरातील नाल्यांतून मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास ४० टक्के झाले आहे. काही भागांत नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे त्यात अडथळे येत असून ही बांधकामे काढण्याबाबत काहीच हालचाली नसल्याने तेथे काम करणे अवघड झाल्याचे सांगितले. त्यावर महापौरांनी कंपनी मनपाला नाल्यांवरील अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले.