आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हात सुजलेल्या रुग्णाला घाटीच्या निवासी डॉक्टरची मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सलाइनची सुई वाकडी घुसत असल्याने वेदनेने किंचाळणार्‍या रुग्णाला घाटीच्या मेडिसिन विभागातील डॉक्टर प्रसाद यादव यांनी बेदम मारहाण करत अपघात विभागातील पोलिस चौकीत नेले. पोलिस कर्मचार्‍यांसमोरही त्यांनी रुग्णाला बदडले. या प्रकाराची लेखी तक्रार अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांच्याकडे करण्यात आली आहे.

सुई वाकडी घुसल्याने रवींद्र बाळासाहेब गायकवाड (29) याचा हात आधीच हात सुजला होता. त्यात बेदम मारहाण करून डॉक्टरने त्याचे तोंडही सुजवले. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने रेल्वेस्टेशन भागातील बनेवाडीतील रवींद्र 3 ऑगस्टला रात्री नऊ वाजता घाटीत दाखल झाला. पावणेअकरा वाजता त्याला सलाइन लावण्यात आले होते. सलाइन वाकडे शिरत असल्याने रवींद्र जोरजोरात ओरडू लागला. तेव्हा डॉक्टर यादव यांनी त्याला ओरडू नको, असे म्हणत पलंगावरून खाली खेचले व मारहाण करत थेट पोलिस चौकीत नेले. पोलिसांसमोरच मारहाण होत असल्याने तेही चक्रावून गेले. डॉक्टरांना समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते काहीएक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत रवींद्रची सुटका केली. यानंतर हताश झालेला रवींद्र आणि त्याच्या आई-वडिलांनी उपचार न करता घाटीतून काढता पाय घेतला. पोलिसांनी तत्काळ या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक र्शीपाद परोपकारी आणि अधिष्ठाता डॉ. भोपळे यांना लेखी कळवली. पोलिस जमादार एस. डी. राठोड यांनी बेगमपुरा पोलिसांत तक्रार दिली आहे.

फुटेजच्या आधारे कारवाई
डॉक्टरांनी मारहाण केल्याची घटना अद्याप माझ्या निदर्शनास आणून दिली नाही. अपघात विभागात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यामुळे खरा प्रकार लक्षात येऊ शकतो. फुटेज बघून वैद्यकीय अधिकारी दोषी आढळल्यास नक्की कारवाई करू.
-डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक.