आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजूंना स्वत:च्या पेन्शनच्या पैशांतून मदत करणारे ‘डॉक्टर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विद्यापीठातील सेवानविृत्त प्राध्यापक डॉ. डी. जी. धुळे यांनी अनेक गरजूंना मदतीचा हात दिला आहे. पेन्शनच्या पैशांतून ते गरजूं विद्यार्थी आणि इतरांना मोफत साहित्य पुरवतात. आतापर्यंत त्यांनी २० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. गरजू महिलांसाठी बालवाडी शिक्षिकेचे मोफत प्रशिक्षण देण्याची सोयही केली आहे. आतापर्यंत १८० महिलांना हे प्रशिक्षण दिले आहे.

डॉ. धुळे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील विडूळ या छोट्याशा गावचे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. आईने मोलमजुरी करून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रसायनशास्त्र विभागात त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले. नविृत्त झाल्यानंतर ते गरिबांचा आधार बनले. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना घडवण्याचा चंग बांधला आहे.

नविृत्तीनंतरही मदत : डॉ. धुळे यांनी २०१३ मध्ये नर्सिंग अभ्यासक्रमापासून ते इंजिनिअरिंग क्षेत्रातील गरजू मुलांच्या शिक्षणासाठी खर्च उचलला. नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला अॅडमशिनचा खर्च देऊन कपडे, बूट, पुस्तके दिली. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाची पुस्तके, तर मुलीला पुस्तकांचा संच मोफत दिला. तसेच मंगल मेहत्ता मशिन अंतर्गत कबीरनगरात असलेल्या लहुजी साळवे आरोग्य केंद्र परिसरात मोफत बालवाडी शिक्षिकेचे प्रशिक्षण देण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. अनेक गरीब महिला याचा लाभ घेत आहेत. त्यांना विविध शैक्षणिक साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. यासाठी मुख्य शिक्षिका म्हणून वंदना सुरडकर, सहशिक्षिका म्हणून उज्ज्वला हविाळे यांची नियुक्ती केली. आतापर्यंत १८० महिलांना बालवाडीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

घरीच केली राहण्याची व्यवस्था
डॉ. धुळे सध्या मातोश्री वृद्धाश्रमात राहतात. पूवीर्ते नंदनवन कॉलनीत राहत असत. त्यावेळी त्यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांची स्वत:च्या घरी जेवण्याची, राहण्याची व्यवस्था करून मुलांच्या अभ्यासाचा संपूर्ण खर्च उचलला.