आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor Neglect HIV Ladies Patient In Ghati Hospital

एचआयव्हीग्रस्त महिलेला घाटीतून हाकलले, डॉक्टरांनी केसपेपर चुरगाळून फेकून दिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- उपचारांसाठी घाटी रुग्णालयात आलेल्या जळगावच्या एका एचआयव्हीग्रस्त महिलेला डॉक्टरांनी हुसकावून लावल्यामुळे ती उपचारांअभावी अपघात विभागासमोर उघड्यावर पडून आहे.

शनिवारी घाटीत जळगावहून उपचारांसाठी 36 वर्षीय महिला आली. उपचारांसाठी अपघात विभागात गेली. डॉक्टरांनी तिचा केस पेपर चुरगाळून फेकल्याची माहिती तिच्यासोबत आलेल्या महिलेने दिली. वर्षभरापूर्वी तिच्या पतीचाही याच आजाराने मृत्यू झाला. 12 वर्षीय मुलालाही रोग जडला आहे. पीडित महिलेवर जळगावच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.

घशाच्या आजारावर उपचार घेण्यासाठी तिला जळगावच्या डॉक्टरांनी घाटीत पाठवले. शुक्रवारी दुपारी ती बाह्यरुग्ण विभागात गेली. तिला दाखल करून घ्यावे, अशी सूचना बाह्यरुग्ण विभागातून करण्यात आली, परंतु अपघात विभागातील डॉक्टरांनी हुसकावून लावले. काही समाजसेवकांनी या दोघींची गाडगेबाबा आश्रमात राहण्याची सोय केली. शनिवारी सकाळी ती वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांच्या दालनात गेली. निवासी डॉक्टरांनी दाखल करून घ्यावे, असे आदेश दिले. दाखल झाल्यानंतर तिला दोन इंजेक्शन्स दिले आणि थोड्याच वेळेनंतर वॉर्डाबाहेर काढले.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना

मला पीडित महिलेबाबत फोनवर माहिती मिळाली होती. तिला दाखल करून घ्यावे, अशी सूचना सहकार्‍यांना दिली होती. मात्र, कोणत्या डॉक्टरांनी त्या महिलेला बाहेर काढले आणि नेमके काय झाले आहे, याबाबत चौकशी करतो आणि तिच्यावर उपचार करतो. डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक.

एचआयव्हीग्रस्त महिला शेवटच्या घटका मोजत असताना डॉक्टरांनी तिला उपचारांसाठी दाखल करून घ्यायला हवे होते किंवा तिच्यासोबतच्या महिलेला ते घरी घेऊन जावे, असे नम्रपणे सांगू शकत होते. मात्र, डॉक्टरांनी तिला हाकलून लावल्याने माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. नितीन वाकुडे, अध्यक्ष, बाबा साई एड्सग्रस्त मुला-मुलींचे बालगृह