आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरच्या मालमत्तेत हिश्श्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ, पतीवर 20 लाखांच्या अपहाराचा गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठणगेट परिसरातील सनी कॉर्नर येथील गोरे नेत्रालय अँड लेझर सेंटरच्या डॉक्टरांविरुद्ध त्यांच्याच डॉक्टर पत्नीने माहेरच्या मालमत्तेत हिश्श्यासाठी मानसिक शारीरिक छळ आणि २० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार क्रांती चौक पोलिसांत नोंदवली असून या मारहाण, छळ, जिवे मारण्याच्या धमकीसह अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
मूळ मुंबईच्या नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मानसी अभिजित गोरे (३५, रा. दहिसर, मुंबई) यांच्या तक्रारीनुसार त्यांचे पती अभिजित दिवाकर गोरे, सासरे दिवाकर गोरे आणि सासू यांनी संगनमताने 8 ऑगस्ट २००९ पासून २० जुलैपर्यंत त्यांना दवाखान्यात नवीन साहित्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये तसेच माहेरच्या मालमत्तेत ५० टक्के हिस्सा आणण्यास सांगून वारंवार काठीने मारहाण शिवीगाळ करून शारीरिक मानसिक छळ केला. स्वकष्टाचे २० लाख रुपयेदेखील नवऱ्याने देता त्याचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सपोनि शेख अकमल करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...