आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरने लिहिली ३७०० पानांची भगवद््गीता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - व्यवसायाने डॉक्टर असलेल्या डॉ. अनिल पटवर्धन यांनी जगातील सर्वात मोठी भगवद््गीता लिहिण्याचा मान मिळवला आहे. डाॅ. पटवर्धन हे मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरीचे, पण गुजरातमधील बार्डोली गावात स्थायिक झाले. स्वत:चे रुग्णालय सांभाळून त्यांनी भगवद््गीता आणि उपनिषदांसह अनेक धार्मिक ग्रंथांचे अध्ययन केले. सतत पंधरा वर्षांच्या अभ्यासानंतर पुढील आठ वर्षे त्यांनी आजच्या परिस्थितीला अनुरूप मराठी भाषेत भगवद््गीता लिहिली. एकूण नऊ खंड आणि हजार ७०० पानांची ही जगातील सर्वात मोठी भगवद््गीता ठरली आहे.
डाॅ. पटवर्धन यांचे बालपण सुरत येथे गेले. शालेय शिक्षण गुजरातीतून झाले, पण आईवडिलांनी त्यांना मराठी भाषेचे उत्तम ज्ञान दिले. तेच त्यांना गीता लिहिताना कामी आले. एम.डी. बालरोगतज्ज्ञ ही पदवी घेतल्यावर त्यांनी बार्डोली येथे स्वत:चे रुग्णालय सुरू केले. वयाच्या २८ व्या वर्षी कोेइंबतूर येथील आर्ष विद्या संस्थेचे प्रमुख स्वामी दयानंद सरस्वती यांच्याशी त्यांचा संपर्क आला. मेडिकल सायन्स आणि आध्यात्म याची त्यांनी चांगली सांगड घातली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी भगवद गीता होम स्टडी हा ग्रंथ लिहिला असून यावर त्यांनी अनेक प्रवचने दिली आहेत. त्यांचाच सारांश डॉ. पटवर्धन यांनी तीन हजार सातशे पानांत मांडला आहे.

औरंगाबादच्या महापेडिकॉनमध्ये स्टॉल...
शहारात आयोजित देशपातळीवरील बालरोगतज्ज्ञांच्या परिषदेला डॉ. पटवर्धन हजर राहिले. त्यांनी आपल्या खंडांच्या भगवद््गीतेच्या पुस्तकांचा एक स्टाॅलही लावला. कुठेलीही जाहिरात अथवा पत्रक देता ते फक्त चौकशी करणाऱ्या जिज्ञासूंनाच हा ग्रंथ विक्री करतात.

सोप्या भाषेत समग्र गीता
डाॅ.पटवर्धन म्हणतात, मनुष्य जन्म दुर्लभ आहे. यात मोक्ष, विवेक, विचार, गुरू, कर्मसिद्धांत, कर्मफळ, सुरक्षितता, धर्मविचार, आत्मज्ञान यावर विस्तृत विवेचन केले आहे. ही शांकरभाष्यावर आधारित असून पूर्वी इंग्रजीतून प्रकाशित झाली आहे. आता ती मराठीत उपलब्ध आहे. चेन्नईच्या आर्ष विद्या रिसर्च अँड पब्लिकेशनने ही भगवद््गीता प्रकाशित केली.

अकराशे तासांची आॅडिओ गीता
डाॅ. पटवर्धन यांनी या तीन हजार सातशे पानांवर आधारित अकराशे तासांची आॅडिओ गीता तयार केली आहे. ही त्यांनी स्वत:च्या आवाजात तयार केली हे विशेष.
बातम्या आणखी आहेत...