आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर, वकिलांना हवीत भाजपची तिकिटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उच्च शिक्षित लोक राजकारणात येत नाहीत, अशी नेहमीच ओरड होते. मात्र, औरंगाबाद महानगपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखती देण्यासाठी मोठ्या संख्येने उच्चशिक्षित आल्याचे चित्र होते. यात डॉक्टर, वकील, एमबीए, पदव्युत्तर, शिक्षिक आदी पदांवर राहिलेल्या इच्छुकांचा समावेश होता.

भाजपच्या दोन दिवसांच्या मुलाखतीदरम्यान जवळपास ६०० जणांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेश म्हणजे यामध्ये दहा ते पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक उच्चशिक्षित होते. वकील, डॉक्टर तसेच एम.ए. झालेल्या उमेदवारांनी मुलाखत दिली. मनपात दरवेळी गोंधळ पाहायला मिळतो. मनपात ज्या प्रश्नावर चर्चा होणे अपेक्षित आहे ती होत नाही. तर अनेकदा उमेदवार सुशिक्षित नसल्यामुळे कराराच्या वेळी नगरसेवकांना माहितीदेखील नसते. त्यामुळे उच्चशिक्षित नगरसेवक सभागृहात आले तर मनपाचा कारभार सुधारण्यास मदत होईल, असे मत या वेळी आलेल्या उच्चशिक्षीत इच्छुकांनी सांगितले.