आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शवविच्छेदसाठी नेताना ‘तो’ झाला जिवंत, पोलिस दाखल करणार होते खुनाचा गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्र‍तीकात्‍मक छायाचित्र - Divya Marathi
प्र‍तीकात्‍मक छायाचित्र
सोयगाव (औरंगाबाद) - देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते. याची प्रचिती काल सोयगावातील गोंदेगाव येथे आली. येथील एका युवकाला आठ जणांनी बेदम मारहाण केली. यात तो जबर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्‍यान डॉक्‍टरांनी तो मृत झाल्‍याचे घोषित केले. याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली.
डॉक्टरांनी हा तरुण मृत झाल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांनी अंत्यविधीची तयारी केली. पण मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याने आधी शवविच्छेदन करणे आवश्यक होते. परंतु, डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषीत केल्यानंतर सुमारे तासाभरानी शवविच्छेदनासाठी घेऊन जाताना त्याचे हृदयाचे ठोके सुरू झाले. दरम्यान, सोयगाव पोलिस ठाण्यात त्या आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेची तालुक्‍यात एकच चर्चा आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, नेमके काय झाले.... कसा झाला हा तरुण जिवंत... कसा उडाला पोलिसांचा गोंधळ....आणि बरेच काही..
बातम्या आणखी आहेत...