आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांकडून हजारो लाइक या माहितीपटाला मिळत आहेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांची पडझड सुरू आहे. या स्थळांची मूळ माहिती जतन करण्यासाठी प्रा. मतीन परवेज यांनी औरंगाबाद अॅट ग्लान्स नावाचा माहितीपट तयार करून तो यूट्यूबवर टाकला आहे. देशी-विदेशी पर्यटकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसून याचे दर्शन घेता येत आहे. नागरिकांकडून हजारो लाइक या माहितीपटाला मिळत आहेत.
मौलाना आझाद महाविद्यालयात २७ वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी हा विषय शिकवणारे प्रा. मतीन परवेज यांनी पर्यटन आणि ऐतिहासिक वास्तूंच्या माहितीचे जतन करतानाच इतरांना त्याची माहिती देण्याचा छंद जोपासला आहेे. ऐतिहासिक पर्यटन स्थळांची होणारी पडझड चिंतेची बाब आहे. या पर्यटनस्थळांचे नेहमी दर्शन होण्याच्या दृष्टीने एेतिहासिक ठेवा माहितीपटाच्या माध्यमातून जिवंत राहणार आहे. प्रा. मतीन परवेज यांनी २०१२ मध्ये माहितीपटाच्या माध्यमातून पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या माहितीचा खजिना जगाला उपलब्ध करून दिला आहे.

पर्यटकांना याचा लाभ
^पर्यटन, धार्मिकस्थळाचा माहितीपट यूट्यूबवर उपलब्ध केल्यामुळे कोणत्याही ठिकाणी बसून हजारो देशी-विदेशी पर्यटक याचा लाभ घेत आहेत. -प्रा. मतीन परवेज, मौलाना आझाद महाविद्यालय

काय आहे माहितीपटात? ५२दरवाजे, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिर, मलिक अंबर मजार, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, हजरत ख्वाजा जर जरी बक्ष अलैह रहैमतुल्ला अलैह मजार, बावीस ख्वाजा दर्गा, औरंगजेब अलेैह मजार, पाणचक्की, बीबी का मकबराचा समावेश आहे.

अशी सुचली कल्पना
पाकिस्तानी कवयित्री वहिदा नसीम यांनी धार्मिक स्थळांवर कविता लिहिल्या आहेत. याची प्रेरणा घेऊन प्रा. मतीन परवेज यांनी ऐतिहासिक वास्तू आणि पर्यटनस्थळांची डॉक्युमेंट्री बनवली. यामुळे ऐतिहासिक स्थळांची माहिती डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध झाली आहे.

दृक््श्राव्य चित्रफीत
मोहंमदरफी यांनी गायलेल्या १०० गाण्यांचे संकलन करून प्रा. परवेज यांनी २०११ मध्ये ‘अ ट्रिब्यूट टू मोहंमद रफी’ नावाची दृक््श्राव्य चित्रफीत बनवली आणि ती इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे मुख्य संपादक विश्वरूप रायचौधरी यांना अभ्यासासाठी पाठवली. त्याचा अभ्यास करून रॉय यांनी प्रा. परवेज यांचे संशोधन मान्य केले आणि रफी यांचे नाव रेकॉर्डमध्ये घेतले होते. या कार्याबद्दल प्रा. मतीन परवेज यांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले होते.
बातम्या आणखी आहेत...