आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदपत्रांसाठी उमेदवारांची धावपळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडाळा - वैजापूर तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र ऑनलाइन भरावयाचे आहे.

ग्रामपंचायत कार्यालयातून शौचालय प्रमाणपत्र, बेबाकी, अपत्य प्रमाणपत्र, रहिवासी अशी अनेक कागदपत्रे असल्यावरच पूर्ण फॉर्म भरला जात आहे; परंतु या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुकांची चांगलीच धावपळ होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. खंडाळा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राखीव जागेसाठी अर्ज दाखल करणाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.