आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुत्र्याने रुगणालयात आणला मानवी अर्भक, संपूर्ण प्रकरण झाले सीसीटीव्हीत कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - येथील सरकारी रुगणालयात एका कुत्र्याने कॅरिबॅगमध्ये बांधलेले अर्भक आणल्याने एकच खळबळ उडाली. या कॅरिबॅगमध्ये जवळपास 6 महिन्यांच्या मुलाचे अर्भक होते. ते एका कपड्यात गुंडाळून कॅरिबॅगमध्ये बांधण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रुगणालय प्रशासनाने पोलिसांना घटनास्थळी बोलावले. सीसीटीव्हीत हा प्रसंग कैद झाला आहे. 
 
 
सीसीटीव्हीत काय दिसले?
- सुरुवातीला रुगणालयात हे अर्भक कुणी आणि कधी आणले याची कुणालाही माहिती नव्हती. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी रुगणालयाबाहेर लावलेला सीसीटीव्ही चेक केला. त्यामध्ये एक कुत्रा तोंडात कॅरिबॅग पकडून रुगणालयात नेत असल्याचे दिसून आले आहे. त्याच कॅरिबॅगमध्ये अर्भक सापडला आहे. 
- कुणातरी रुगणालयाबाहेर अर्भक फेकून गेले होते. यानंतर सकाळी एका कुत्र्याला ती बॅग सापडली. कुत्र्यानेच ती बॅग रुगणालयाच्या पोर्चमध्ये आणली होती. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी याबाबत प्रशासनाला कळवल्यानंतर त्यामध्ये बाळ असल्याचे निदर्शनास आले. 
- पोलिसांनी अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतर त्याचे खरे वय आणि तो कधी जन्मला अशा विविध बाबी समोर येतील.
- यासोबतच, तो अर्भक कुणी फेकला आणि कुत्र्याकडे कसा गेला याचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...