आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात २३ ऑक्टोबर रोजी ‘डॉग शो’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो आणि महानगरपालिका, औरंगाबाद यांच्यातर्फे रविवार, २३ ऑक्टोबर रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर, खडकेश्वर येथे जातिवंत (प्युअर ब्रीड) श्वानांचे भव्य प्रदर्शन (डॉग शो) आयोजित करण्यात आला आहे. प्रदर्शनामध्ये विविध जातींच्या १५० ते २०० श्वानांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये कारवान, पश्मी, लॅब्रडॉर, रॉटविलर, कॉकेर स्पनिएल्स, डॅशहुंड, जर्मन शेफर्ड, पोमॅनेरियम, डॉबरमन, पग, ल्हासा, अँप्सो, गोल्डन रिट्रायवर, बॉक्सर, बुल मॅस्टिफ, ग्रेट डेन, बिगलं, डाल्मेशियन, सेंट बर्नार्ड, अंकिता, बुल डॉग, पिट बुल तसेच इतरही अनेक जातींचे श्वान सहभागी होणार आहेत. सहभागासाठी प्रवेशिका डॉ. अनिल भादेकर, डॉ. नीलेश जाधव, डॉ. नीती सिंग तसेच पेट पॅशन, पेट झोन, बी. आर. डिस्ट्रिब्युटर्स, कामधेनू, पेट वर्ल्ड या दालनांमधून उपलब्ध आहेत.
बातम्या आणखी आहेत...