आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जमाव झोडपत असतानाच तो माझ्या अंगावर झेपावला, जखमी अहमदने सांगितली आपबीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरगुती कामानिमित्त मी मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास शहागंजमध्ये गेलो होतो. तेथील भाजीमंडईकडून चेलीपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभा असताना काही अंतरावर जमाव होता. त्यांच्या हातात लाठ्या-काठ्या होत्या. ते मध्यभागी असलेल्या कुत्र्याला काठ्यांनी मारण्याचा प्रयत्न करत होते. अचानक घोळका मोडत ते कुत्रे माझ्या अंगावर झेपावले आणि काही कळण्याच्या आत माझ्या पायाला जोरदार चावा घेऊन पळाले. लोकही त्याच्यामागे पळत सुटले होते. मी प्रचंड घाबरलो होतो. तसाच घरी (हडको एन-१३) आलो आणि पँट काढल्यावर लक्षात आले की त्या कुत्र्याने माझ्या पोटरीचा लचका तोडला होता. घाटी रुग्णालयात इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या १६ वर्षाच्या अहमद शेखने दिव्य मराठी प्रतिनिधीला आपबीती सांगितली. त्या वेळी याच कुत्र्याने लचके तोडलेले २५ जण उपचार घेण्यासाठी आले होते. त्यात दोन, तीन वर्षांच्या बालकांचाही समावेश आहे.

जिन्सी, राजाबाजार, जाधवमंडी, जुना मोंढा, नबाबपुरा आदी भागात मंगळवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. जिन्सीतील तीन नंबरच्या गल्लीतूून आलेल्या तपकिरी रंगाच्या या कुत्र्याच्या मानेला मोठी जखम झाली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांिगतले. त्याला शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मोहीम सुरू होती. सूरज तुळशीबागवाले (रा. राजाबाजार) म्हणाले की, माझा मुलगा तन्मय (३ वर्षे) गणेश मंडपासमोर खेळत होता. साडेचारच्या सुमारास त्या कुत्र्याने त्याच्यावर झेप घेऊन त्याला खाली पाडले आणि त्याच्या डोळ्याच्या खाली अन् गालावर पंजे मारत चावे घेतले. तन्मयचे किंचाळणे ऐकून माझी भाची गायत्री (१६) मदतीला धावली असता कुत्र्याने तिलाही चावे घेतले. दोघांनाही आधी हेडगेवार, नंतर घाटीत रुग्णालयात घेऊन आलो.

चाव्यात हे जखमी : रोहित दीनानाथ पाटील (८, रा. बजाजनगर), श्रुती मनोज देवडे (११, रा. बंजारा कॉलनी), रेहान इम्रान खान (८, रा. इंदिरानगर), दानिश नासेर सय्यद (१०, रा. इंदिरानगर), उमर आमिर बेग (५, रा. अल्तमश कॉलनी), प्राची रामाजी जिगोले (२, रा. शहागंज), बुशरा इरफान खान ८, रा. नवाबपुरा), फैजान रफिक सय्यद (८, रा. शहागंज), कुणाल राजेश टक (९, रा. गांधीनगर), रॉनी रवी हटवाल (३, रा. गांधीनगर), अन्वय वामन भिंगारे (११, रा.) शिवशंकर कॉलनी, तन्मय सूरज तुळशीबागवाले (३, रा. जाधवमंडी), गायत्री रमेश तुळशीबागवाले (१६, रा. जाधवमंडी, राजाबाजार), शेख अहमद (१६, रा. हडको एन १३), रमेश भाटणे (५५, रा. टाऊन सेंटर), तब्बस्सुम शेख (३०, रा. इंदिरानगर), ऋषभ मेहकळे (१६ रा. शहागंज, चेलीपुरा), सुयोग वाठोळे (१९ रा. मुकुंदवाडी), अब्बास खान (१३, रा. नवाबपूरा), चैतन्य जोशी (१३, रा. पिसादेवी), चिन्मय जोशी (१३, रा. पिसादेवी), दादाराव बारभांडे (४०, रा. कांचनवाडी), लक्ष्मण काळे (३८, रा. भावसिंगपुरा).

घाटीत आठ एआरव्ही
शहरात वारंवार कुत्रा चावण्याचे प्रकार घडतात. दिवसाला किमान २० ते २५ नागरिकांना कुत्रे चावा घेत आहेत. आजच्या प्रकारात २५ जणांना कुत्रा चावला. सर्व रुग्ण उपचारांसाठी घाटीत गेले. त्यातील फक्त एआरव्ही शिल्लक असल्याने त्यांना ते देण्यात आले. उर्वरित सर्वांना बाहेरून खरेदी करावे लागले. एआरएस मुबलक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

श्रीरामनगरातही उच्छाद
कुत्रे आणि मोकाट जनावरांचा सिडको एन-२ येथील श्रीरामनगर विठ्ठलनगरातील नागरिकांना त्रास होत आहे. मनपाच्या पथकाने अनेकदा मोकाट जनावरे कुत्रे पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले. गेल्या महिन्यात मोकाट जनावरांनी विजेचा खांब पाडल्याने परिसरातील वीजपुरवठा रात्रभर बंद होता. मागील महिन्यात रात्री नातेवाइकाच्या घराच्या शोधात असलेल्या दोघांचा कुत्र्यांनी चावा घेतला होता.
लक्षणे पिसाळलेल्याची पण
आक्रमक झालेला कुत्रा चार-पाच जणांचा चावा घेतल्यावर थकून जातो. तर पिसाळलेला कुत्रा दिसेल त्याला चावतो. हलत्या वस्तू हे त्याचे लक्ष्य असले तरी काही वेळा तो झाड, टायरचाही कडाडून चावा घेतो. मंगळवारची घटना पिसाळलेल्या कुत्र्याची आहे. असे कुत्रे मरण पावल्यावर त्यांच्या मेंदूचा हिपोकँपस् हा भाग तपासून तो पिसाळला की नाही, हे निश्चित करता येते. - डॉ.अनिल भादेकर, श्वान तज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...