आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोमेस्टिक कार्गोचा ग्राहकांवर बोजा, एक किलो पार्सलसाठी आधीपेक्षा ३३५ रुपयांचा जास्तीचा खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विमानतळावर मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या डोमेस्टिक एअर कार्गाे सेवेमुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडत आहे. पूर्वीच्या तुलनेत ग्राहकांना पार्सल पाठवण्यासाठी एका किलोमागे ३३५ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. पार्सलचे वजन वाढले की खर्चही वाढणार आहे. याशिवाय विमानात माल चढवणे आणि उतरवण्यासाठी दोन ठिकाणी वेगवेगळे पैसे मोजावे लागणार आहेत.

२५ लाख रुपये खर्चून विमानतळाच्या जुन्या टर्मिनलची रंगरंगोटी आणि दुरुस्ती करण्यात आली. येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कार्गो सेवेची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे सध्या डोमेस्टिक सेवेला सुरुवात झाली आहे. मात्र, ही सेवा ग्राहकांना महागडी ठरत आहे. ‘दिव्य मराठी’ने याबाबत तज्ज्ञांशी बाेलून याचा आढावा घेतला. औरंगाबादहून मुंबईला एका पाकिटाचे कुरियर कार्गाे सेवेने पाठवण्यासाठी पुढीलप्रमाणे खर्च येतो. पार्सलसाठी किमान १३५ रुपये हँडलिंग शुल्क भरावे लागतात. हे शुल्क नव्याने नियुक्त झालेल्या कंपनीचे आहे. यासोबत ५०० रुपये एअरवे शुल्क लागते. याअंतर्गत पार्सलचे सिक्युरिटी चेक केले जाते, तर एअरलाइन्स शुल्क म्हणून हजार रुपये लागतात. दिल्ली विमानतळावर हे कुरियर उतरवून घेण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या सेवेसाठी एफएसई शुल्क म्हणून १०० रुपये लागतात, तर ज्या एअरलाइन्स कंपनीमार्फत कुरियर पाठवले त्याचे डिलिव्हरी चार्जेस म्हणून २०० रुपये आणि त्यावर १५ टक्के सेवा कर असे २२२ रुपये जमा करावे लागतात. अशा पद्धतीने एका पाकिटाला मुंबईत पोहोचण्यासाठी १९५७ रुपये मोजावे लागत आहेत.
३३५रुपयांचा बोजा : विमानतळावरविमानसेवा सुरू झाली तेव्हापासून कार्गाे सेवा सुरू होती. विमान कंपन्या ग्राहकांकडून थेट पार्सल जमा करून हव्या त्या ठिकाणी पोहोचवत होत्या. परंतु एक जूनपासून नवी दिल्लीच्या कार्गाे सर्व्हिस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे विमान कंपन्यांना थेट ग्राहकांपासून पार्सल घेण्याचे अधिकार राहिलेले नाहीत. थर्ड पार्टी कंपनी म्हणजेच कार्गाे सर्व्हिस सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आता हे कुरियर पाठवले जात आहे. मात्र, हे करण्यासाठी कंपनी ग्राहकांकडून शुल्क आकारते. वर नमूद केल्याप्रमाणे एका पाकिटाच्या कुरियरसाठी ग्राहकांना थर्ड पार्टी हँडलिंग शुल्क म्हणून १३५ रुपये अदा करावे लागतात, तर दुसऱ्या शहरात हे कुरियर उतरवण्यासाठी पुन्हा एकदा २०० रुपये अाणि १५ टक्के सेवा कर असे २२२ रुपये अदा करावे लागतात. एका कुरियरमागे ३३५ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. पूर्वी हे शुल्क भरण्याची गरज भासत नव्हती. म्हणजेच कार्गाे सेवेचे केंद्रीकरण केल्यामुळे ग्राहकांना फटका बसत आहे.
एअरलाइन्स कंपन्या नाराज
सेवेचाखर्च वाढल्याने एअरलाइन्स कंपन्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे एअर इंडियाने अद्याप विमानतळ प्राधिकरणासोबत एअर कार्गोसाठी करार केलेला नाही. पूर्वीचे काम सुरळीत सुरू असताना थर्ड पार्टी कशासाठीे, असा सवाल ऑपरेटर करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...